महाशिवरात्रीनिमित्त नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरात होणाऱ्या अभिनेत्री प्राजक्ता माळीच्या
कार्यक्रमाल विरोध केला जातोय. माजी विश्वस्तांनी ग्रामीण पोलिसांना पत्र
लिहिल्यानंतर आता पुरातत्त्व विभागाने मंदिर विश्वस्तांना इशारा दिला आहे.
Related News
दहिहंडा तीर्थक्षेत्राचा ऐतिहासिक विकास! २.५० कोटींच्या सुविधांसह भव्य लोटस सेलिब्रेशन हॉलचे लोकार्पण
दहिहंडा : अकोला जिल्ह्यातील श्री संत रूपनाथ महाराज संस्थान, दहिहंडा येथे भक्ती...
Continue reading
सातारा जिल्हा बँकेत राजकीय भूकंप! भाजपला ९, राष्ट्रवादीला ८ तर शिंदेसेनेला ४ जागा; सत्तेचे मोठे समीकरण!
सातारा : महाराष्ट्राच्या राजकारणात कधी कोणते समीकरण बदलेल, याचा नेम नसतो. स...
Continue reading
ओमर अब्दुल्ला सरकार कोसळणार : जम्मू-काश्मीरच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून, मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्या सरकारसमोर राजकीय संकट उभे राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सत...
Continue reading
SpiceJet चा मोठा निष्काळजीपणा? विमान अचानक रद्द, संतप्त प्रवाशांचे धावपट्टीवरच ठिय्या आंदोलन!
विमान प्रवास हा कमी वेळेत इच्छित स्थळी पोहोचण्याचा सोयीस्कर पर्याय मानला जातो. मात्र,...
Continue reading
नेपाळमध्ये २ हेलिकॉप्टरची भीषण टक्कर! एकाचा मृत्यू, थरारक अपघात
नेपाळमधील माऊंट एव्हरेस्ट परिसरातून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. लँडिंग करण्याच्या प्रयत्नात असलेल्या दोन...
Continue reading
दिया मिर्झाच्या दिवाळी व्हिडीओवरून मुंबईत राजकीय वाद पेटला! रितू तावडेंचा संताप; म्हणाल्या, ‘दिवाळी हिंदूंचा सण, त्यांनी शिकवू नये’
मुंबई महापालिकेने पर्यावरणपूरक दिवाळी...
Continue reading
सीजेपी फिनिश! पीस बॉन्डवर स्वाक्षरी केल्याने नेत्यांचे राजकीय करिअर संपले; माजी न्यायमूर्ती मार्कंडेय काटजू यांचा मोठा दावा
पीस बॉन्डचे उल्लंघन केल्यास अनेक महिने तुरुंगात राहावे ...
Continue reading
दीपक पाटील दांदळे यांना पुण्यात ‘हिंदूरत्न’ पुरस्काराने सन्मानित!
सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त आयोजित राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्यात मान्यवरांच्या उपस्थितीत गौरव; सामाज...
Continue reading
अमित शाहांच्या भेटीतून राष्ट्रवादीच्या राजकारणात नवी चर्चा! पार्थ पवार, सुनेत्रा पवार गैरहजर; अर्थखात्यासाठी नेत्यांची दिल्लीवारी?
महाराष्ट्राच्या राजकारणात राष्ट्रवादी ...
Continue reading
अकोला जिल्ह्यातील ३० कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्वांचा ‘अकोलारत्न’ पुरस्काराने गौरव; विशेष पुस्तकाचे प्रकाशन!
स्वामी विवेकानंद ग्रुप ऑफ ऑर्गनायजेशनचा अभिनव उपक्रम; शैक्षणिक, सामाजिक, ...
Continue reading
विधानपरिषदेच्या निकालानंतर भाजप नेत्याचा रविंद्र धंगेकरांवर संतापजनक हल्लाबोल! '१२ पक्ष फिरलेला माकडछाप' म्हणत नवनाथ बन यांची जहरी टीका
पुणे पदवीधर मतदारसंघातील पराभवावरून भाजप आण...
Continue reading
अमेरिकेत हवेतच दोन हेलिकॉप्टरची भीषण धडक! पत्त्यासारखी कोसळली दोन्ही हेलिकॉप्टर; प्रशिक्षणार्थीसह तिघांचा दुर्दैवी मृत्यू
ओरेगन (अमेरिका) : अमेरिकेच्या ओरेगन राज्यात दोन हेलिकॉप्ट...
Continue reading
महाशिवरात्रीनिमित्त नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरात होणाऱ्या अभिनेत्री प्राजक्ता
माळीच्या कार्यक्रमाच्या अडचणीत वाढ झाली आहे. या कार्यक्रमाविरोधात माजी विश्वस्त ललिता
शिंदे यांनी ग्रामीण पोलिसांना पत्र पाठवल्यानंतर आता पुरातत्त्व विभागाने (ASI) त्र्यंबकेश्वर देवस्थानला पत्र पाठवलं आहे.
मंदिरातील सांस्कृतिक कार्यक्रमावर एएसआयनं आक्षेप नोंदवला आहे. महाशिवरात्रीनिमित्त
सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करणं हे एएमएएसआर कायद्यानुसार नियमबाह्य असल्याचं म्हटलंय.
त्याचप्रमाणे कार्यक्रमांपूर्वी एएसआय दिल्लीकडून परवानगी घेण्याचे आदेश त्यांनी देवस्थानला दिले आहेत.
माजी विश्वस्त ललिता शिंदे यांनी प्राजक्ता माळीच्या कार्यक्रमावर आक्षेप घेतला होता. मंदिरात गर्दीमुळे कायदा आणि
सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, अशा इशारा एएसआयने दिला होता. त्याचप्रमाणे मंदिरातील व्हीआयपी
दर्शनासाठी उत्तरेकडील गेटवर 200 रुपये शुल्क घेतल्याचाही प्रकार समोर आला आहे. अशा प्रकारे प्रवेश शुल्क घेणं
हे एएमएएसआर कायद्याचं उल्लंघन असल्याचं एएसआयनं म्हटलं आहे. याबाबत देवस्थान ट्रस्टने तातडीने सुधारात्मक
उपाययोजना कराव्यात अशी सूचना पुरातत्व विभागाने दिली आहे. त्याचप्रमाणे संबंधित प्रकरणावर तातडीने
कार्यवाही करण्याचे आदेश देण्याबाबत दिल्ली आणि मुंबई एएसआय अधिकाऱ्यांना कळवलं आहे.
माजी विश्वस्त ललिता शिंदे यांनी पोलिसांना दिलेल्या पत्रात म्हटलंय, “यापूर्वी सेलिब्रिटींच्या कार्यक्रमाची मंदिरात परंपरा नाही.
महाशिवरात्रीला सेलिब्रिटींच्या कार्यक्रमाने चुकीचा पायंडा पाडू नये. महाशिवरात्रीला संध्याकाळी मंदिराच्या प्रांगणात
प्राजक्ताचा ‘शिवस्तुती नृत्याविष्कार’ कार्यक्रम पार पडणार आहे. मात्र या कार्यक्रमामुळे
मंदिरातील धार्मिक वातावरण बिघडू नये.” यावर अद्याप मंदिर विश्वस्तांकडून किंवा प्राजक्ताकडून कोणतीही प्रतिक्रिया समोर आली नाही.
बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त भाविकांची मोठी गर्दी होते.
यादिवशी मंदिर विश्वस्तांकडून कार्यक्रमाचंही आयोजन केलं जातं. यंदा शिवस्तुती नृत्याविष्काराचा
कार्यक्रम मंदिर विश्वस्तांकडून आयोजित करण्यात आला आहे. अभिनेत्री प्राजक्ता माळी तिच्या नृत्यकौशल्यासाठी ओळखली जाते.
याआधी तिने श्री श्री रवीशंकर यांच्या बेंगळुरू इथल्या ‘आर्ट ऑफ लिव्हिंग फाऊंडेशन’च्या आश्रमातही लावणी सादर केली होती.
शास्त्रीय- उपशास्त्रीय नृत्य संगीताच्या मेळाव्यात प्राजक्ताला गुरुंसमोर लावणी सादर करण्याची संधी मिळाली होती.
Read more news here : https://ajinkyabharat.com/bharatacha-pakistan-is-not-a-khenyacha-decisionable-terrorist-hallyachaya-shakyane-vadhali-concern/