ऑपरेशन सिंदूरनंतर भारताची स्पष्ट भूमिका; “मुंबई २६/११ नंतरचा सर्वात मोठा हल्ला”

ऑपरेशन सिंदूरनंतर भारताची स्पष्ट भूमिका; “मुंबई २६/११ नंतरचा सर्वात मोठा हल्ला” - विक्रम मिस्री

भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’च्या माध्यमातून पाकिस्तानात घुसून केलेल्या कारवाईनंतर आज भारतीय सेनेकडून

आणि परराष्ट्र मंत्रालयाकडून महत्वाची पत्रकार परिषद घेण्यात आली. या पत्रकार परिषदेत

भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर माहिती दिली.

Related News

“२२ एप्रिल रोजी लष्कर-ए-तोयबाशी संबंधित टीआरएफ (द रेझिस्टन्स फ्रंट) या पाकप्रशिक्षित दहशतवादी संघटनेने

जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये पर्यटकांवर क्रूर हल्ला केला. या हल्ल्यात २५ भारतीय आणि १ नेपाळी नागरिकाचा मृत्यू झाला.

मुंबई २६/११ नंतरचा हा सर्वात गंभीर हल्ला होता,” असे त्यांनी सांगितले.

विक्रम मिस्री यांनी स्पष्ट केलं की पहलगाम हल्ल्याची जबाबदारी ‘टीआरएफ’ या गटाने घेतली असून,

या गटाचा थेट संबंध लष्कर-ए-तोयबाशी आहे. “हल्ल्याच्या तपासात दहशतवाद्यांशी पाकिस्तानचे थेट संबंध उघड झाले आहेत,” असेही त्यांनी नमूद केले.

त्यांनी सांगितले की भारताच्या गुप्तचर यंत्रणांना पाकिस्तानमधून पुन्हा भारतावर हल्ला होण्याची माहिती आधीच मिळाली होती.

त्यामुळे अशा हल्ल्यांना वेळेत रोखणे गरजेचे होते. “काश्मीरमधील विकास थांबवण्यासाठी आणि अस्थिरता निर्माण करण्यासाठी हे कट कारस्थान रचले गेले होते,” असेही ते म्हणाले.

‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे भारताने केवळ दहशतवाद्यांना प्रत्युत्तर दिले नसून, दहशतवाद पोसणाऱ्या पाकिस्तानी यंत्रणांना देखील स्पष्ट संदेश दिला आहे.

Read Also : https://ajinkyabharat.com/23-minutes-pakistancha-maj-utvanya-operation-sindoor-nantar-pakistani-gugalwar-search-what-is-this-vermilion/

Related News