ऑपरेशन सिंदूरवर सीएम योगींची स्पष्ट भूमिका

"सिंदूर छिनणाऱ्यांनी खानदान गमावलं" – ऑपरेशन सिंदूरवर सीएम योगींची स्पष्ट भूमिका

लखनऊ | 8 मे 2025जम्मू-कश्मीरमधील पहलगाम हल्ल्यानंतर भारताने केलेल्या ‘ऑपरेशन

सिंदूर’वर प्रतिक्रिया देताना उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी रोखठोक वक्तव्य करत म्हटलं की,

“ज्यांनी भारताच्या बहिणींचं सिंदूर हिसकावण्याचा प्रयत्न केला, त्यांनी आपलं अख्खं खानदान गमावलं.”

Related News

लखनौमध्ये आयोजित नागरिक सुरक्षा मॉक ड्रिल दरम्यान जनतेला संबोधित करताना योगींनी सांगितलं की,

“देशाच्या आपत्कालीन परिस्थितीत प्रत्येक नागरिकाने ‘राष्ट्र प्रथम’ या भावनेने काम करायला हवं.”

त्यांनी स्पष्ट केलं की, ऑपरेशन सिंदूर केवळ एक लष्करी कारवाई नाही, तर भारतीय स्त्रीच्या सन्मानासाठी दिलेला

भावनिक आणि निर्णायक संदेश आहे. योगींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाचं कौतुक करत सांगितलं की,

“ही कारवाई भारताच्या नव्या भूमिकेचं प्रतीक आहे – जो प्रत्येक दुस्साहसाला सडेतोड उत्तर देतो.”

पहलगाम हल्ल्यात 26 निष्पाप नागरिकांचा बळी गेला होता, ज्यात एक नेपाळी नागरिकही होता.

या पार्श्वभूमीवर भारतीय लष्कराने पीओके आणि पाकिस्तानातील नऊ दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले.

या कारवाईत हाफिज सईद आणि मसूद अजहर यांच्यासारख्या दहशतवाद्यांचे गड नेस्तनाबूत करण्यात आले.

मुख्यमंत्री म्हणाले, “देशाच्या सन्मानाशी कोणी खेळण्याचा प्रयत्न केल्यास त्याला जबरदस्त किंमत मोजावी लागेल.”

त्यांनी भारतीय सैन्य, वायुदल आणि नौदलाचे विशेष आभार मानले आणि सर्व नागरिकांना सतर्क आणि एकजुटीने उभं राहण्याचं आवाहन केलं.

Read Also : https://ajinkyabharat.com/operation-sindoorwar-sansadelil-all-party-meeting-suru/

Related News