जम्मू/श्रीनगर | ८ मे २०२५ – पहलगाममधील पर्यटकांवर झालेल्या भीषण हल्ल्यानंतर भारताने प्रतिउत्तर देत
‘ऑपरेशन सिंदूर’च्या माध्यमातून अनेक दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. यामुळे बिथरलेल्या पाकिस्तानने आता नियंत्रण रेषेवर
(LoC) अंधाधुंध गोळीबार आणि मोर्टार हल्ले सुरू केले आहेत. विशेष म्हणजे, पाकिस्तानने आता थेट
Related News
रावळपिंडी स्टेडियमजवळ ड्रोन हल्ला
“वीज नाही” अशी तक्रार महागात;
चारधाम यात्रेत हेलिकॉप्टरचा अपघात;
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा डिजीटल स्ट्राइक!
वाडेगावात वादळी वाऱ्याचा कहर
संकटांशी झुंज देणाऱ्या उर्वशी संघवी यांचे प्रेरणादायी यश
ऑपरेशन सिंदूरचा परिणाम? देशभरात हवाई वाहतूक ठप्प
मुंबईकरांचा प्रवास महागला!
‘या खुदा, आज बचा लो’ – पाकिस्तानच्या संसदेत खासदाराचा भावनिक आवेग
S-400 ‘सुदर्शन चक्र’ची किमया!
ऑपरेशन सिंदूरवर सीएम योगींची स्पष्ट भूमिका
ऑपरेशन सिंदूरवर संसदेतील सर्वदलीय बैठक सुरू
नागरिकांच्या घरांना लक्ष्य करायला सुरुवात केली असून सीमावर्ती अनेक गावे रिकामी करण्यात आली आहेत.
भारतीय लष्कराच्या माहितीनुसार, ७-८ मेच्या रात्री पाकिस्तानच्या चौक्यांनी कुपवाडा, बारामुल्ला,
उरी आणि अखनूर या भागांमध्ये कोणतीही पूर्वसूचना न देता छोट्या शस्त्रांपासून तोफांपर्यंत गोळीबार केला.
भारतीय लष्कराकडूनही योग्य प्रत्युत्तर देण्यात आले आहे.
गावांमध्ये धुराचे साम्राज्य, नागरिक जखमी
सीमावर्ती एका गावातील स्थानिकांनी सांगितले की, पहाटे ३ वाजता अचानक गोळीबार सुरु झाला
आणि त्यांचं संपूर्ण कुटुंब घराबाहेर पळालं. “आता इथे फक्त धूर आणि उद्ध्वस्त झालेल्या भिंती उरल्या आहेत.
आमची मुलंही जखमी झाली आहेत,” असा हळहळता सूर एका नागरिकाने व्यक्त केला.
पुंछ जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान
पुंछ जिल्हा हा पाकिस्तानकडून होणाऱ्या संघर्षविराम उल्लंघनाने सर्वाधिक बाधित झालेला असून,
फक्त बुधवारच्या फायरिंगमध्ये १५ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. पाकिस्तानकडून मोर्टार हल्ले सतत सुरू आहेत.
परिणामी, पुंछमधील अनेक गावं रिकामी झाली असून, नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात येत आहे.
सरकारकडून सुरक्षित स्थळी स्थलांतराची सुविधा
ज्याठिकाणी सरकारने आधीच सुरक्षित प्लॉट तयार ठेवले होते, तिथे नागरिकांना स्थलांतरित केले जात आहे.
एकाच जागी दोन-तीन कुटुंबं सध्या एकत्र राहत असून, गोळीबार थांबल्यानंतर पुन्हा परतण्याची आशा व्यक्त होत आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/s-400-sudarshan-chakrachi-kimaya/