बुलढाणा जिल्ह्यातील पार्थसांगी नवेगाव परिसरात जंगलात अस्वलाच्या हल्ल्यात एक व्यक्ती गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. दीपक मोतीराम तेलगोटे (वय 40) हे जंगलात असताना त्यांच्यावर अचानक अस्वलाने हल्ला केला.
गंभीर जखमी झालेल्या दीपक यांना तत्काळ आलेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आले. मात्र, परिस्थिती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी अकोल्याला हलवण्यात आले आहे.
घटनेची माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आणि पंचनामा केला. प्रशासनाने नागरिकांना जंगलात जाण्याबाबत सतर्कता बाळगण्याचे आवाहन केले आहे.
Related News
मोखा ग्रामपंचायतीचा बेजबाबदार कारभार :
अवकाळी पावसाचा वणीसह परिसराला तडाखा;
दहीगाव प्रकरणाचा निषेध; तेल्हारा शहर बंद, बाजारपेठा ठप्प
अलीगढमधील हॉटेलमध्ये देवतांच्या चित्रांसह नॅपकिन दिल्याने गोंधळ;
पाच वर्षांनंतर कैलास-मानसरोवर यात्रेला पुन्हा सुरूवात;
चंदननगरमध्ये तरुणाचा निर्घृण खून
पातूर शहरात ‘रान कसायांची’ टोळी सक्रिय
अकोल्यात गुड फ्रायडे भाविकतेने साजरा;
एका महिन्याच्या चिमुरडीची निर्घृणपणे हत्या….
काही सेकंदांची चूक आणि आयुष्य संपलं…
जय श्री राम ग्रुप द्वारा गौसेवा कार्य
ईस्टर संडेच्या तयारीने धार्मिक वातावरण भारावले
वन विभागाने घटनेचा तपशील नोंदवून अस्वलाच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी उपाययोजना सुरू केल्या आहेत.
इतर महत्त्वाच्या बातम्या Read Also : https://ajinkyabharat.com/it-is-not-you-who-makes-the-mistake-of-suddenly-revealing-the-reason-behind-the-rash-act/