माना (प्रतिनिधी – उद्धव कोकणे):
राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी असलेल्या एन.एम.एम.एस (NMMS) शिष्यवृत्ती
परीक्षेची गुणवत्ता यादी नुकतीच जाहीर झाली असून, जिल्हा परिषद विद्यालय,
Related News
श्रीराम नवमी निमित्त अकोला शहरात धार्मिक शोभायात्रेची जय्यत तयारी
लोहारा येथील सर्वज्ञ विद्या मंदिरमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न
डोळ्यांखालील डार्क सर्कल्सने आहात हैराण? जाणून घ्या कारणे आणि घरगुती उपाय
करुणा व धनंजय मुंडे प्रकरणात नवीन वळण;
||देह वेचावा कारणीं|
अकोट येथे माळी महासंघाच्या नामफलकाचे उद्घाटन आणि पदाधिकाऱ्यांचा सन्मान
“बँकांमधील आंदोलन थांबवा” – उदय सामंत यांच्याशी भेटीनंतर राज ठाकरे यांचा मनसैनिकांना आदेश
शिर्डीत भिकाऱ्यांची मोहीम; “मी ISRO अधिकारी” म्हणताच पोलिसही गोंधळले!
अकोट शहर पोलिसांकडून मॉक ड्रिलचे प्रभावी सादरीकरण – सुरक्षा यंत्रणा सज्ज
रेल येथे महादेव-पार्वतीचा विवाह सोहळा
हातगावमध्ये धाडसी दरोडा : 65 ग्रॅम सोने व लाखोंची रोकड लंपास
श्रीराम नवमी निमित्त मूर्तीजापुरात — सुप्रसिद्ध गायिका अधिष्टा व अनुष्का भटनागर
माना येथील विद्यार्थिनीने पुन्हा एकदा शाळेचा झेंडा उंचावला आहे.
वर्ग आठवीतील विद्यार्थिनी समृद्धी माणिक चिमणकर हिने या शिष्यवृत्ती परीक्षेतील
गुणवत्ता यादीत स्थान मिळवत शाळेच्या यशाची परंपरा कायम राखली आहे.
समृद्धीने अभ्यासात सातत्य, जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर हे यश संपादन केले आहे.
राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी NMMS अंतर्गत दरमहा 1000 रुपये,
एकूण 48,000 रुपयांची शिष्यवृत्ती चार वर्षांसाठी दिली जाते.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणात आर्थिक अडथळा येऊ नये यासाठी ही योजना अत्यंत उपयुक्त ठरत आहे.
सध्या जिल्हा परिषद विद्यालय, माना येथील सुमारे २० विद्यार्थी या शिष्यवृत्तीचा लाभ घेत आहेत.
शाळेत नवोदय व एन.एम.एम.एस परीक्षांसाठी विशेष तयारी वर्ग, मार्गदर्शन सत्रे आयोजित केली जातात.
या उपक्रमांतून विद्यार्थ्यांना अधिक चांगली तयारी करता येते, आणि त्याचेच हे फलित आहे.
शाळेतील शिक्षकवृंद, मुख्याध्यापक, कर्मचारी, पालकवर्ग तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष,
उपाध्यक्ष व सदस्य यांचे सहकार्य शाळेच्या एकत्रित यशामागील मोठे योगदान ठरले आहे.
समृद्धीचे मुख्याध्यापक, शिक्षक, कर्मचारी व पालक वर्गाकडून
अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.