मूर्तिजापूर (प्रतिनिधी): अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यातील हातगाव येथे
सायंकाळच्या सुमारास एका शेतकरी कुटुंबावर धाडसी दरोडा टाकण्यात आला.
या घटनेत लाखों रुपयांची रोकड व अंदाजे 65 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने अज्ञात दरोडेखोरांनी लंपास केले.
Related News
शिवसेना (उबाठा) मध्ये नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होणार
दोन कोटी विस लाखां च्या नावाखाली रुग्णसेवकाला सायबर गुंड्याकडून गंडवण्याचा प्रयत्न
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश
अतिक्रमण हटाव मोहीम का फक्त दुर्बळांवरच? अपंगाचे दुकान तोडले –
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारी
अकोल्यात विविध मागण्यांसाठी आज धरणे आंदोलन करणाऱ्यात आले
नवी दिल्लीतील भारत मंडपममध्ये पार पडलेल्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल
अखेर कातखेड,पिंपळखुटा गावात रस्त्याच्या कामाला सुरुवात
शेलुबाजार आरोग्य केंद्रात क्षयरुग्ण तपासणी शिबिर; डिजिटल एक्स-रेद्वारे ८७ संशयितांची तपासणी
पार्डी ताड–पिंपळखुटा रस्ता सहा महिन्यांतच खड्ड्यात! मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेवर प्रश्नचिन्ह
अखेर लेखी आश्वासनाने उपोषणाची मांघार!
दहीहंडा रोडवर मोठमोठे खड्डे; नागरिकांच्या सहकार्यातून काही खड्ड्यांची भर घाल
या धक्कादायक घटनेनंतर घरमालक अशोक नामदेवराव बोळे (वय अंदाजे 60) यांना ताणामुळे
हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
घटनेनंतर हातगाव गावासह मूर्तिजापूर शहरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरू केला असला तरी चोरट्यांचा काही ठावठिकाणा लागलेला नाही.
मूर्तिजापूर व तालुक्यात गेल्या काही महिन्यांपासून चोरी, दरोडे व घरफोडीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे.
या घटनांमुळे नागरिकांमध्ये प्रचंड अस्वस्थता व भीती पसरली असून, पोलिस यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
चोरटे जणू पोलिसांना खुलेआम आव्हान देत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे.
या घटनेनंतर पोलिस प्रशासनावर त्वरित कारवाई करण्याचा दबाव वाढला असून,
स्थानिक नागरिकांनी वाढत्या गुन्हेगारी प्रकारांवर आळा घालण्यासाठी सतर्क गस्त,
सीसीटीव्ही यंत्रणा व विशेष पथक स्थापनेची मागणी केली आहे.