NEET UG 2025 साठी नोंदणी करण्याची शेवटची तारीख 7 मार्च आहे. त्यामुळे ज्या उमेदवारांनी
अद्याप अर्ज केलेला नाही, त्यांनी लवकरात लवकर नीट neet.nta.nic.in च्या
अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन अर्ज करावा. NTA ने परीक्षेची तारीख 4 मे निश्चित केली आहे.
Related News
अकोला (गंगानगर बायपास):
गत १० वर्षांपासून भक्तीमय उपक्रमांची परंपरा जपणाऱ्या सालासर बालाजी मंदिरात
यंदा हनुमान जन्मोत्सवाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे.
शनिवार, दिनांक १२ एप्रिल...
Continue reading
तेल्हारा (९ एप्रिल २०२५):
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तेल्हारा येथे शिवसेनेची आढावा बैठक उत्साहात पार पडली.
शिवसेना पक्षप्रमुख व उपमुख्यमंत्री ...
Continue reading
अकोला :
विदर्भातील नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी! अमरावती विमानतळावरून
अलायन्स एअर कंपनीची "मुंबई-अमरावती-मुंबई" विमानसेवा आता सुरू झाली आहे.
या सेवेमुळे अमरावती आणि मुंबई दरम्...
Continue reading
अकोट (दि. ९ एप्रिल २०२५):
नगर परिषद शिक्षक सहकारी पत संस्था, अकोट याच्या अध्यक्ष पदासाठी आज झालेल्या निवडीत तसलीम ताहेर पटेल
यांची चौथ्यांदा अविरोध निवड करण्यात आली. त्यांच्या का...
Continue reading
बार्शीटाकळी, जि. अकोला (प्रतिनिधी):
आसरा माता यात्रा,अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी तालुक्यातील दोनद खुर्द येथील एक प्रसिद्ध धार्मिक उत्सव...या यात्रेदरम्यान,
अनेक भक्त आणि भाविक ...
Continue reading
सात दिवसांत सुरळीत पाणीपुरवठा न झाल्यास हंडा मोर्चाचे आयोजन
मंगरुळपीर तालुक्यातील कळंबा बोडखे या गावातील लोकांना अनेक दिवसांपासून पाणीपुरवठा होत नाही.
याबाबत कळंबा बोडखे गावाती...
Continue reading
अकोला, दि. १० (प्रतिनिधी):
अकोला शहरातील रेल्वे स्टेशन परिसरात एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर ७ एप्रिल रोजी
रात्री एका मोटारसायकलस्वाराने अत्याचार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आ...
Continue reading
मुर्तिजापूर, दि. १० (तालुका प्रतिनिधी):
तालुक्यातील रसुलपूर, विराहीत, कानडी या गावांतील शेतकऱ्यांनी नापिकी, शेतमालाला न मिळालेला आधारभूत भाव,
विमा व दुष्काळी मदतीचा अभाव यामुळे ...
Continue reading
अकोट (प्रतिनिधी):
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे आणि माजी आमदार रामाभाऊ कराळे यांच्या प्रेरणेतून आणि शिवसेना
पक्षप्रमुख व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हि...
Continue reading
अकोला (प्रतिनिधी):
सुरत कलकत्ता हायवे क्रमांक त्रेपन्न शिवनी येथून अकोल्याकडे येणाऱ्या चार चाकी वाहनाच्या चालकाचे
अचानक नियंत्रण सुटल्यामुळे अपघात झाल्याची घटना आज घडली आहे.
डॉ....
Continue reading
अकोट (प्रतिनिधी):
अकोट तालुक्यातील बोर्डी ग्रामपंचायतीने केलेल्या विकास कामांबाबत तक्रारीनंतर चौकशी झाली
आणि ग्रामपंचायत सचिवासह इतर चार व्यक्तींवर उपविभागीय अधिकारी अकोट यांनी द...
Continue reading
अकोला (प्रतिनिधी):
अकोला औद्योगिक वसाहतीतील ए.डी.एम. ऍग्रो कंपनी मध्ये कार्यरत असलेल्या स्थानिक सुरक्षा रक्षकांच्या
न्यायासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) ठाम भूमिका घेत ...
Continue reading
तुम्ही NEET UG 2025 साठी अद्याप अर्ज केला नसेल तर घाई करा, कारण त्याची शेवटची तारीख 7 मार्च 2025 आहे.
यानंतर नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) नॅशनल एलिजिबिलिटी एंट्रन्स टेस्ट अंडरग्रॅज्युएट (NEET UG)
ची अर्ज प्रक्रिया बंद करेल. इच्छुक आणि पात्र उमेदवार neet.nta.nic.in च्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन
ऑनलाईन अर्ज करू शकतात. 7 मार्च रोजी रात्री 11.50 वाजेपर्यंत अर्ज सादर करता येणार असून शुल्क भरण्याची शेवटची तारीख आहे.
अर्जाची विंडो बंद झाल्यानंतर उमेदवारांना 9
मार्च ते 11 मार्च या कालावधीत आपल्या अर्जात दुरुस्ती करता येणार आहे.
यानंतर 26 एप्रिलपर्यंत परीक्षेची सिटी स्लिप जारी केली जाईल आणि उमेदवार 1 मे पासून त्यांचे
NEET UG 2025 परीक्षेचे प्रवेशपत्र देखील डाउनलोड करू शकतात.
NEET UG 2025 परीक्षेच्या तारखा
ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख : 7 फेब्रुवारी ते 7 मार्च 2025 (रात्री 11.50 वाजेपर्यंत)
शुल्क भरण्याची शेवटची तारीख : 7 मार्च 2025 (रात्री 11.50 वाजेपर्यंत)
अर्जात सुधारणा करण्याची तारीख : 9 मार्च ते 11 मार्च 2025
परीक्षा सिटी स्लिप जारी करण्याची तारीख : 26 एप्रिल 2025
ॲडमिट कार्ड जारी करण्याची तारीख: 1 मे 2025
परीक्षा दिनांक : 4 मे 2025
निकाल जारी दिनांक: 14 जून 2025 (संभाव्य)
NEET UG 2025 अर्ज शुल्क किती?
सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवारांसाठी 1700 रुपये, जनरल-ईडब्ल्यूएस, ओबीसी (नॉन क्रीमी लेयर)
साठी 1600 रुपये आणि एससी, एसटी, पीडब्ल्यूडी आणि थर्ड जेंडर उमेदवारांसाठी 1,000 रुपये अर्ज शुल्क आहे.
NEET UG 2025 साठी अर्ज कसा करावा?
सर्वप्रथम NEET neet.nta.nic.in च्या अधिकृत संकेतस्थळावर जा.
त्यानंतर होमपेजवरील ‘रजिस्ट्रेशन फॉर NEET UG 2025 2025’ लिंकवर क्लिक करा.
त्यानंतर, आपले नाव, संपर्क माहिती आणि ईमेल सारखे मूलभूत तपशील लिहा, आपले खाते तयार करा.
आता क्रेडेन्शियल्स वापरून लॉगिन करा आणि वैयक्तिक तपशील, शैक्षणिक पात्रता आणि परीक्षा केंद्र निवडा.
NEET UG 2025 परीक्षा दिनांक आणि वेळ
NEET UG 2025 परीक्षा 4 मे 2025 रोजी होणार आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी 2 ते सायंकाळी 5
या वेळेत ही परीक्षा होणार असून एकूण कालावधी 180 मिनिटे म्हणजेच 3 तासांचा असेल.
Read more news here : https://ajinkyabharat.com/epfo-madha-motha-change-union-minister-dili-anand-varta-atm-madhun-kadhu-shakal-pf/