भारताचा गोल्डनबॉय आणि उत्तम भालाफेकपटू
नौरज चोप्राने इतिहास रचला आहे.
Related News
पावो नूरमी गेम्स २०२४ मध्ये त्याने गोल्डमेडलवर आपले नाव कोरले आहे.
पहिल्यांदाच नीरज चोप्रा या खेळात सुवर्णपदक जिंकला आहे.
२०२३ मध्ये नीरज या स्पर्धेत भाग घेऊ शकला नव्हता.
तर २०२२ मध्ये त्याला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले होते;
मात्र मंगळवारी फिनलैंड या ठिकाणी झालेल्या पावो नूरमी गेम्स स्पर्धेत (१८ जून)
नीरज चोप्राने ८५.९७ मीटर दूर भाला फेकत सुवर्ण पदक जिंकले आहे.
नीरज चोप्राच्या या कामगिरीचे देशात कौतुक होत आहे.
नीरज चोप्राने टोकियो ऑलिम्पिकच्या दरम्यान भालाफेक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून
भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला होता.
आता २६ जुलै २०२४ पासून पॅरिसमध्ये ऑलिम्पिक स्पर्धा सुरू होत आहे.
अशात पावो नूरमी गेम्समध्ये नीरज चोप्राने केलेली कामगिरी
ही त्याच्या चाहत्यांसाठी आणि भारतासाठी नक्कीच आनंदाची बातमी आहे.
तर ओलिवयर हेलांडरने ८३.९६ मीटर अंतरावर भाला फेकला.
त्याला कांस्य पदक देऊन गौरवण्यात आले आहे.
नीरजच्या नंतर त्याचा प्रतिस्पर्धी टोनी केरानेन याने
८४.१९ मीटर दूर भाला फेकला होता.
स्पर्धेत एकूण सहा फेऱ्यांपैकी पहिल्या फेरीत नीरजने ८३.६२ मी.,
तर दुसऱ्या फेरीत ८३.४५ मी. भालाफेक केली.
८५.९७ मी. ची भालाफेक त्याची सर्वोच्च ठरली,
चौथ्या फेरीत ८२.२१ मी. भाला फेकला पाचव्या फेरीत त्याचा फाऊल झाला.
तर सहाव्या फेरीत ८२.९७ इतकी भालाफेक केली.
भारताच्या नीरज चोप्राला ९० मीटर दूर भाला फेकता आलेला नाही.
हा टप्पा ओलांडण्याचे लक्ष त्याने ठेवले आहे;
परंतु खांदा दुखीमुळे त्याला त्यात अडथळा येत आहे.
जर्मनीच्या मॅक्स डेहनिंगने हॉल येथे झालेल्या स्पर्धेत
९०.२० मीटर भाला फेकून विक्रम नोंदविला होता.
Read also: https://ajinkyabharat.com/vidarbha-3523-schools-will-be-closed/