२०२४ ची लोकसभा निवडणुक नुकतीच पार पडली आहे.
एनडीएने बहुमताच्या जोरावर सरकार स्थापन केले आहे.
Related News
‘मोनिका ओ माय डार्लिंग’… ८६ व्या वर्षीही हेलेन यांचा जलवा कायम;
‘१२वी नापास, पण मोठमोठ्या वेबसाईट्स हॅक करणारे’
नवीन बस स्थानक टी पॉइंटवर अपघाताचा थरार;
शिवरमध्ये जागतिक शून्य सावली दिन संत विचारधनाने साजरा;
अकोल्यात झिरो शॅडो डेचा अनुभव; नागरिक म्हणाले – सावलीच नाहीशी झाली!
२४ मे २०२५ चं हवामान : वीकेंडला मुसळधार पावसाचा इशारा,
ऑपरेशन सिंदूरवरून प्रेरित ‘स्पेशल बनारसी साडी’;
पटना-गया आणि बक्सर दरम्यान लवकरच धावेल ‘नमो भारत एक्सप्रेस’;
“इंग्लंडचा रणसंग्राम! पहिल्याच दिवशी 498 धावा,
“वादळी वारे, मुसळधार पाऊस आणि रेड अलर्ट:
“पाकिस्तानच्या ‘पाण्याच्या’ धमकीवर भारताचा संताप;
“आर्यन खान तुरुंगात फक्त फळं आणि पाण्यावर;
तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली.
इंडिया आघाडीला विरोधात बसावे लागले आहे.
अशातच राहुल गांधी यांनी दिलेल्या एका मुलाखतीत एनडीए आघाडीबाबत
मोठा गौप्यस्फोट केला आहे.
एनडीएचे लोक आमच्या संपर्कात असल्याचे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.
दरम्यान, राहुल गांधी यांनी नुकतीच फायनान्शियल टाइम्सला मुलाखत दिली आहे.
या मुलाखतीत राहुल गांधी म्हणाले की,
अनपेक्षित निवडणुकीच्या निकालानंतर भारतातील राजकीय परिस्थितीमध्ये मोठा बदल झाला आहे.
पंतप्रधान मोदींच्या सरकारला आपल्या अस्तित्वासाठी संघर्ष करावा लागेल,
तसेच भाजपच्या खासदारांची संख्या कमी आहे.
त्यामुळे एक छोटीशी गडबड सरकारला अडचणीत आणू शकते.
राहुल गांधी पुढे म्हणाले की, आत्ता स्थापन झालेल्या
मोदी सरकारमध्ये मोठ्याप्रमाणात असंतोष आहे.
त्यामुळे एनडीएतील काही लोक आमच्या संपर्कात आहेत,
लोकसभा निवडणुकीदरम्यान मोदींनी धार्मिक तणावाचा फायदा घेण्याचा प्रयत्न केला.
त्यांनी भारतातील मोठ्या मुस्लिम अल्पसंख्याकांना घुसखोर म्हटले आहे.
राहुल पुढे म्हणाले की, आम्ही पाठीमागे हात बांधून लढलो.
भारतीय जनतेला, गरीब जनतेला, त्यांना नेमके काय करायचे आहे हे माहीत होते.
न्यायव्यवस्था, प्रसारमाध्यमे, संस्थात्मक संरचना हे सर्व विरोधकांसाठी बंद होते.
त्यांनी गेली १० वर्षे अयोध्येच्या मुद्द्यावर प्रचार केला परंतु त्यांना अयोध्येने नाकारले.
भारतीय राजकीय विश्लेषकांनी एनडीए आघाडीच्या स्थिरतेवर प्रश्न उपस्थित केले आहेत.
यंदा एनडीए आघाडी कमकुवत असून सत्ता टिकवण्यासाठी
भाजपला छोट्या मित्रपक्षांवर अवलंबून राहावे लागणार आहे
असं मत राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केले आहे.