निवडणूक आयोगाने गोठवली ‘तुतारी’ आणि ‘बिगुल’ मुक्तचिन्ह
‘राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी- शरदचंद्र पवार’ पक्षाच्या X अकाऊंटवरून माहिती देताना
निवडणूक आयोगाने ‘तुतारी’ आणि ‘बिगुल’ मुक्तचिन्ह गोठवली असल्याचं म्हटलं आहे.
Related News
श्रीराम नवमी निमित्त अकोला शहरात धार्मिक शोभायात्रेची जय्यत तयारी
लोहारा येथील सर्वज्ञ विद्या मंदिरमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न
डोळ्यांखालील डार्क सर्कल्सने आहात हैराण? जाणून घ्या कारणे आणि घरगुती उपाय
करुणा व धनंजय मुंडे प्रकरणात नवीन वळण;
||देह वेचावा कारणीं|
अकोट येथे माळी महासंघाच्या नामफलकाचे उद्घाटन आणि पदाधिकाऱ्यांचा सन्मान
“बँकांमधील आंदोलन थांबवा” – उदय सामंत यांच्याशी भेटीनंतर राज ठाकरे यांचा मनसैनिकांना आदेश
शिर्डीत भिकाऱ्यांची मोहीम; “मी ISRO अधिकारी” म्हणताच पोलिसही गोंधळले!
अकोट शहर पोलिसांकडून मॉक ड्रिलचे प्रभावी सादरीकरण – सुरक्षा यंत्रणा सज्ज
रेल येथे महादेव-पार्वतीचा विवाह सोहळा
एन.एम.एम.एस शिष्यवृत्ती परीक्षेत माना विद्यालयाची परंपरा कायम
हातगावमध्ये धाडसी दरोडा : 65 ग्रॅम सोने व लाखोंची रोकड लंपास
‘पिपाणी’, ‘बिगुल’ ह्या चिन्हाचा ‘तुतारी’ असा वापर करून
मतदारांची दिशाभूल करण्याचा जो प्रयत्न झाला त्याविरोधात
‘राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी- शरदचंद्र पवार’ पक्षाच्या लढ्याला यश आल्याचं त्यांनी ट्वीट मध्ये म्हटलं आहे.
त्यामुळे आता मतदान यंत्रांवर ‘तुतारी वाजवणारा माणूस’ हेच चिन्ह दिसणार आहे.
लोकसभा निवडणूकीमध्ये सातारा मध्ये भाजपचे उमेदवार उदयनराजे भोसले
आणि पवार गटाचे उमेदवार शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत झाली.
उदयनराजे यांना एकूण 5 लाख 71 हजार 134 मतं पडली.
त्यानंतर पवार यांच्या पक्षाचे उमेदवार शशिकांत शिंदे यांना 5 लाख 38 हजार 363 मतं पडली.
म्हणजेच शिंदे यांचा 32 हजार 771 मतं कमी पडली.
दुसरीकडे याच मतदारसंघात पिपाणी हे निवडणूक चिन्ह असणाऱ्या संजय गाडे
या अपक्ष उमेदवाराला 37 हजार 62 मते मिळाली होती.
बीड मध्येही पिपाणी हे चिन्ह असणाऱ्या उमेदवाराला तिसऱ्या क्रमांकाची मतं मिळाली होती.
त्यामुळे चिन्हावरून होणारा हा घोळ टाळण्यासाठी शरद पवारांनी दाद मागितली होती.
लोकसभा निवडणूकीमध्ये शरद पवारांना मिळालेल्या यशानंतर आता त्यांच्या विश्वास दुणावला आहे.
विधानसभेमध्ये हा फटका टाळण्यासाठी त्यांनी दिलेल्या लढ्याला यश आलं आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/microsoft-server-crash/