आज दिनांक 12 जानेवारी 2026 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठानच्या वतीने राष्ट्रमाता राजमाता मा.साहेब जिजाऊ यांची जयंती मोठ्या उत्साहात व श्रद्धेच्या वातावरणात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे आयोजन प्रतिष्ठानचे कार्यालय, निंबा फाटा (संघ भूमी, हाता फाटा) येथे करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रतिष्ठानचे अध्यक्ष मेजर दिलीप सरदार होते. तर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून निंबा फाटा येथील प्रतिष्ठित नागरिक व उद्योजक किसन भाऊ राऊत हे उपस्थित होते. त्यांच्या हस्ते राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे धूप-दीप पूजन करून कार्यक्रमाची विधिवत सुरुवात करण्यात आली.
यावेळी पंचक्रोशीतील अनेक मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार व लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाला दबंग पत्रकार देवराव परघरमोर, माजी पोलीस पाटील सारंगधरजी घ्यारे, विनोद घ्यारे, माजी उपसरपंच व माजी सरपंच देवमन भाऊ वानखडे, पत्रकार संजय इंगळे, विनोद भारसाकडे, माजी उपसरपंच व तंटामुक्ती अध्यक्ष गणेश वानखडे, वजेगाव येथील सुरज इंगळे, डोंगरगाव बहादूर, तसेच वंचित बहुजन आघाडीचे कट्टर कार्यकर्ते सुभाष भाऊ घ्यारे, हॉटेल राणा सर्वेसर्वा आदी प्रतिष्ठित नागरिकांची उपस्थिती कार्यक्रमाला लाभली.
Related News
मुर्तीजापुर, किनखेड, कामठा – स्व. गुलाबरावजी बांबल विद्यालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त संविधानाचे महत्त्व या विषयावर ...
Continue reading
प्रकाश आंबेडकर यांनी नाशिक आणि पुण्यात गिरीश महाजन यांच्या भाषणातील चूक आणि आरएसएसच्या भूमिकेवर टीका केली. वंचित बहुजन आघाडी प्रमुखांच्या शब्दां...
Continue reading
भारतीय बौद्ध महासभा ग्राम शाखा हाता यांच्या वतीने आयोजित भव्य दोन दिवसीय महापरित्राण पाठ, महासंघदान व धम्म परिषद हाता येथे मोठ्य...
Continue reading
अकोला महानगरपालिकेत सत्तास्थापनेचा तिढा; काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी आणि अपक्षांची भूमिका ठरवणार राजकारणाचे गणित
अकोला महानगरपालिकेत सत्...
Continue reading
Akola Municipal Election Result 2026 मध्ये भाजपला मोठा धक्का बसला असून काँग्रेसने ताकद दाखवली आहे. 9 वर्षांनंतर झालेल्या अकोला ...
Continue reading
अकोला महानगरपालिकेतील प्रभाग क्रमांक १४ मध्ये वंचित बहुजन आघाडीने जबरदस्त विजय मिळविला आहे. या प्रभागात ५ उमेदवार विजयी झाले आहेत, जे संघटनेच...
Continue reading
अकोला जिल्ह्यातील महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय परिस्थितीत मोठा बदल पाहायला मिळत आहे. अलीकडेच वंचित बहुजन आघाडी (VBA) पक्षा...
Continue reading
https://youtu.be/NIpE8McVRGQ
अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर नगरपरिषदेत राजकीय गोंधळ उफाळून आला आहे. भाजपने नगराध्यक्षपदावर विजय मिळवून ११ सदस्य निवडून आणले असले तरी सत्ता स्थापनेनं...
Continue reading
जय बजरंग विद्यालय, चान्नी येथे राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त १२ जानेवारी रोजी एकदिवसीय स्काऊट-गाईड मेळ...
Continue reading
मूर्तिजापूर: स्थानिक राजकारणात आज, १३ जानेवारी २०२६ रोजी, नगरपरिषदेतील उपाध्यक्ष व स्वीकृत सदस...
Continue reading
कार्यक्रमात राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांच्या कार्याचा, त्यागाचा व शिवरायांच्या घडणीत त्यांच्या मोलाच्या योगदानाचा गौरव करण्यात आला. उपस्थित वक्त्यांनी जिजाऊ माँसाहेबांच्या विचारांवर प्रकाश टाकत समाजाने त्यांच्या आदर्शांचा अवलंब करण्याचे आवाहन केले.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठानच्या या उपक्रमामुळे परिसरात सामाजिक व सांस्कृतिक जागृतीचे वातावरण निर्माण झाले. कार्यक्रम शांततेत, शिस्तबद्ध आणि अतिशय उत्साहात पार पडला. पंचक्रोशीतील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून जयंती सोहळ्याला यशस्वी केले.
read also : https://ajinkyabharat.com/celebration-of-rajmata-jijau-and-swami-vivekananda-jayanti-at-lohari-khurd/#google_vignette