पातूर तहसील येथे राष्ट्रीय ग्राहक दिन उत्साहात साजरा मान्यवरांच्या हस्ते शिधापत्रिकेचे वितरण

पातूर तहसील

पातूर :पातूर तहसील कार्यालयाच्या सभागृहात दि. २४ डिसेंबर रोजी राष्ट्रीय ग्राहक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. ग्राहकांचे हक्क, संरक्षण व जनजागृती या उद्देशाने आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नायब तहसीलदार अजय तेलगोटे होते.कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून अखिल भारतीय ग्राहक पंचायत पातूर तालुका अध्यक्ष देवानंद गहिले, महिला तालुका प्रमुख प्रा. करुणाताई गवई, नायब तहसीलदार श्रीकांत घुगे (संजय गांधी निराधार योजना) तसेच नायब तहसीलदार दिनकर केंद्रे उपस्थित होते.

मार्गदर्शन करताना देवानंद गहिले यांनी ग्राहकांचे मूलभूत हक्क, ग्राहक संरक्षण कायदे तसेच फसवणूक टाळण्यासाठी प्रत्येक व्यवहारात पावती घेण्याचे महत्त्व स्पष्ट केले. ग्राहक जागरूक असतील तरच अन्याय व फसवणूक थांबू शकते, असे त्यांनी नमूद केले.प्रा. करुणाताई गवई यांनी महिलांनी ग्राहक म्हणून अधिक सजग राहण्याचे आवाहन केले. दैनंदिन खरेदी, ऑनलाईन व्यवहार तसेच सेवा-सुविधांमध्ये महिलांनी आपले हक्क ओळखून अन्यायाविरुद्ध आवाज उठवावा, असे त्या म्हणाल्या.

अध्यक्षीय भाषणात नायब तहसीलदार अजय तेलगोटे यांनी ग्राहकांच्या हक्कांच्या संरक्षणासाठी प्रशासन सदैव त्यांच्या पाठीशी असल्याचे सांगितले. शासनाच्या विविध योजना व सुविधा सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचे काम प्रशासन प्रामाणिकपणे करीत असल्याचे त्यांनी नमूद केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उखळकर यांनी केले तर आभार प्रदर्शन दूलेखान युसुफखान यांनी मानले. कार्यक्रमाच्या शेवटी मान्यवरांच्या हस्ते लाभार्थ्यांना शिधापत्रिकेचे वितरण करण्यात आले.यावेळी प्रविण जाधव, पराग खंडारे, अक्षय गोरे, प्रमोद घोगरे, मुक्ता राहुडकर, दिपाली चवरे, सुनील उखळकर, पंकज सोळुंके, दिलीप राठोड, मनोहर तेलगोटे आदी मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related News

read also : https://ajinkyabharat.com/temporary-traffic-closure-on-samruddhi-maharagamavar-for-3-days-work-on-installation-of-stage-gantry/

Related News