नवी दिल्ली (दि. ६ मे):
देशात ५४ वर्षांनंतर प्रथमच मोठ्या प्रमाणावर सिव्हिल डिफेन्स मॉक ड्रिल आयोजित करण्यात येत असून,
यासाठी केंद्रीय गृह मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक सुरू आहे. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय गृह सचिव गोविंद मोहन आहेत.
Related News
IPL 2025 : वानखेडेवर सूर्या-राशिदची ‘सुपला-स्नेक’
दिल्लीत केंद्रीय गृह सचिवांची महत्त्वाची बैठक; सर्व राज्यांना अलर्ट
भारत उद्या वाजवणार युद्धाचा सायरन
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे अकोला विमानतळावर आगमन
इंडियन आयडॉल विजेता पवनदीप राजन यांचा अपघात
पाकिस्तानमध्ये आठवडाभरात तिसऱ्यांदा भूकंपाचे धक्के!
उपविभागीय अधिकारी गायब, कोतवाल धडाडीवर
बारावीच्या निकालात यंदाही मुलींची बाजी!
कोणताही भारतीय नाही
बारावीचा निकाल जाहीर
पुणे महामार्गावर तरुणाचा जीवघेणा स्टंट
कौटुंबिक वादातून संतापजनक घटना
बैठकीत सर्व राज्यांचे मुख्य सचिव, सिव्हिल डिफेन्स प्रमुख, तसेच वरिष्ठ सुरक्षा अधिकारी सहभागी झाले आहेत.
केंद्र सरकारने ७ मे रोजी देशातील २४४ जिल्ह्यांमध्ये ही मॉक ड्रिल घेण्याचे आदेश दिले आहेत.
या ड्रिलमध्ये नागरिकांना हवाई हल्ल्याच्या वेळी स्वतःचे संरक्षण कसे करावे, याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.
सायरन वाजवून हल्ल्याची सूचना दिली जाईल आणि त्या अनुषंगाने कृती केली जाईल.
रशियाकडून भारताला युद्धनौका, पाकिस्तानकडून गोळीबार सुरूच
दरम्यान, पाकिस्तानसोबत तणाव वाढत असतानाच,
भारताला रशियाकडून एक आधुनिक युद्धनौका या महिन्यात मिळणार आहे.
२८ मे रोजी रशिया ही युद्धनौका भारतीय नौसेनेच्या ताब्यात देणार, अशी माहिती आहे.
ही युद्धनौका ब्रह्मोस क्षेपणास्त्रांनी सज्ज असून ती शत्रूच्या रडारपासून लपून राहू शकते.
पाकिस्तानने ५ आणि ६ मेच्या रात्री नियंत्रण रेषेवर (LoC) आठ ठिकाणी – कुपवाडा,
बारामुला, पुंछ, राजौरी, मेंढर, नौशेरा, सुंदरबनी आणि अखनूर – शस्त्रसंधीचे उल्लंघन केले.
भारतीय सैन्याने याला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी काही दिवसांपूर्वी दावा केला होता की,
“भारत कधीही सैनिकी कारवाई करू शकतो. नरेंद्र मोदी हे निवडणुकीसाठी संपूर्ण भागाला अणुयुद्धाच्या उंबरठ्यावर नेऊन ठेवत आहेत.“
पहलगाम हल्ल्यानंतर वाढलेला तणाव
२२ एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाल्यानंतर
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव अधिक वाढला आहे. त्यानंतर भारताकडून आक्रमक पवित्रा घेतला जात आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/union-minister-nitin-gadkari-yancha-akola-aircraft/