Nashik Crime : नाशिकमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे.
नाशिकमध्ये दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढत चालली आहे.
मागच्या आठवड्यात एक खून झाला होता.
Related News
Vikram-1 Launch : भारताच्या अवकाश क्षेत्रात नवा इतिहास! पहिल्या खासगी ऑर्बिटल रॉकेटमधून उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण
Vikram-1 Launch यशस्वी...
Continue reading
रिकाम्या पोटी दालचिनीचं पाणी प्यायल्याने वजन कमी होतं का? जाणून घ्या तज्ज्ञ काय सांगतात
वजन कमी करण्यासाठी अनेकजण विविध घरगुती उपायांचा अवलंब करतात. ...
Continue reading
सकाळी कोमट पाण्यात मध पिण्याने खरंच वजन कमी होतं का? जाणून घ्या विज्ञान काय सांगतं
सकाळी उठल्यानंतर कोमट पाण्यात मध मिसळून पिणे हा...
Continue reading
सोनम वांगचूक प्रकरणावर उद्धव ठाकरे यांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल; ‘धर्मेंद्र प्रधान यांना असं काय सोनं लागलं?’
दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान सामाजिक कार्यक...
Continue reading
सोनम वांगचूक रुग्णालयात; ‘माझ्या परवानगीशिवाय कोणतेही औषध देऊ नका’, पत्नी गीतांजली यांची सफदरजंग रुग्णालयाला विनंती
सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक
Continue reading
अशोक खरात प्रकरणात ईडीचे 3 हजार पानी आरोपपत्र; 42.88 कोटींच्या कथित गैरव्यवहारांचा दावा, पत्नीचाही आरोपी म्हणून उल्लेख
स्वयंघोषित आध्यात्मिक गुरू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या
Continue reading
Japan Open 2026 : पी. व्ही. सिंधूची दमदार कामगिरी; ऑलिम्पिक विजेत्या चेन युफेईवर मात करत अंतिम फेरीत धडक
भारताची स्टार बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू...
Continue reading
इराण-अमेरिका तणाव आणखी वाढला; ड्रोन पाडल्याचा इराणचा दावा, तेलवाहू टँकर दुर्घटनेमुळे होर्मुझ सामुद्रधुनीवर चिंता
मध्यपूर्वेतील तणाव दिवसेंदिवस वाढत असून इराण आणि अमेरिका यांच्याती...
Continue reading
आता एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार झाला आहे.
नाशिकमध्ये दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढत चालली आहे.
मागच्या आठवड्यात रंगपंचमी खेळल्यानंतर दोन सख्ख्या भावांची निर्घुण हत्या करण्यात आली होती.
आता एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचाराची घटना घडली आहे.
पुण्याप्रमाणे नाशिकही महिलांसाठी सुरक्षित नसल्याच यातून दिसून येतय.
महिला सुरक्षेसाठी विविध कठोर कायदे बनवूनही महिलांविरोधात घडणारे गुन्हे कमी झालेले नाहीत.
अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार झाला. नाशिकच्या ओझर टाऊनशिपमध्ये ही घटना घडली.
या प्रकरणात पाच संशयित आरोपी फरार आहेत.
नाशिक पोलिसांकडून त्यांचा शोध सुरु आहे.
पोलिसांचे पथक आरोपींच्या मागावर आहे.
मुलगी घरात एकटी असल्याचे बघून नराधमांनी हे अत्याचाराच कृत्य केलं.
आई मजुरी काम करण्यासाठी गेलेली असताना, आरोपीने घरात घुसून हे कुकर्म केलं.
कोणाला सांगितल्यास मारून टाकण्याची धमकी दिली आहे.
मागच्या आठवड्यात जाधव बंधुंची हत्या
मागच्या आठवड्यात नाशिकमध्ये जाधव बंधुंची हत्या करण्यात आली होती.
या प्रकरणातील आरोपींना पोलीस कोठडी देण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी
उमेश जाधव आणि त्यांचे बंधू प्रशांत जाधव यांची रंगपंचमीच्या दिवशी हत्या करण्यात आली होती
रात्रीच्या सुमारास टोळक्याने धारदार शस्त्राने हल्ला करुन जाधव बंधूंचा खून केला होता.
पोलिसांनी काही तासातच खुनातील या सर्व आरोपींना ताब्यात घेतले होते.
न्यायालयात हजर केल्यानंतर तपासासाठी पुन्हा एक दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
उमेश जाधव हे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे पदाधिकारी होते.
कोयत्याने हल्ला
कोयता घेऊन आलेल्या हल्लेखोरांनी सार्वजनिक शौचालयासमोरच जाधव बंधुंवर भीषण हल्ला केला.
अनेक वार अंगावर झाल्याने दोघे बंधु तिथेच रक्ताच्या थारोळ्या कोसळले.
ही घटना घडल्यानंतर स्थानिकांनी दोघा बंधुंना तात्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात नेलं.
पण तिथे डॉक्टरांनी तपसाल्यानंतर त्यांना मृत घोषित केलं.
मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने दोघांचा मृत्यू झाला.
या घटनेनंतर रुग्णालय परिसरात मोठी गर्दी झाली होती.