हा अपघात होताच ही बातमी पंचक्रोशी मध्ये इतक्या वेगाने पसरली की हा अपघात बघण्यासाठी मोठी गर्दी झाली.
नांदेड: नांदेड जिल्ह्यात आलेगाव शिवारामध्ये गुरुवारी दुपारी एक अत्यंत विचित्र व दुर्दैवी अपघात घडला.
कामावर निघालेल्या मजुरांना घेऊन जात असलेला ट्रॅक्टर चालकाचे नियंत्रण सुटल्याने थेट विहिरीत जाऊन कोसळला.
या भीषण अपघातात 6 ते 7 मजुरांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती असून, तीघांना वाचवण्यात यश आले आहे.
Related News
महामार्गावर डाळंबी जवळ कार पलटी एक जखमी
मुर्तिजापूर बसस्थानकावर अनोळखी व्यक्तीचा मृतदेह! परिसरात एकच खळबळ, ओळख अद्यापही गूढ!
अकोलखेड येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा
अकोल्यातील १३५ वर्षांची ‘कच्छी मशीद’ आता डिजिटल; ‘अजान’ थेट मोबाईलवर ऐकता येणार!
WCL मध्ये नोकरीचं आमिष दाखवून अकोल्यातील २५ बेरोजगारांची अडीच कोटींची फसवणूक; माजी आमदाराच्या नावाने धमकीचा आरोप
ठाकरेंना दुबेंचं थेट आव्हान : “हिम्मत असेल तर बिहारमध्ये या!”
अकोट खरेदी-विक्री संघ ज्वारी खरेदीत झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करून गुन्हे दाखल करा
ग्रामीण भागातील पांदन रस्त्याची अवस्था बिकट
शेत रस्त्याचे रूपांतर तलावात : शेतकरी हतबल
पंढरीत विठ्ठल भक्तांचा महापूर
राजकीय चर्चा थांबवा! राज ठाकरेंचा पदाधिकाऱ्यांना स्पष्ट आदेश
| गोवंश तस्करीचा प्रयत्न हाणून पाडला
घटनेनंतर संपूर्ण गावात खळबळ माजली असून, सध्या घटनास्थळी बचाव व मदतकार्य सुरू आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि प्रशासनाची पथके तात्काळ घटनास्थळी दाखल झाली आहेत.
विहिरीत पाणी असल्याने ट्रॅक्टर पूर्णपणे बुडाला असून, फक्त एक चाक वरून दिसत आहे.
हे सर्व मजूर हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील गुंज गावाचे रहिवासी होते.
ते आलेगावातील दगडोजी शिंदे यांच्या शेतावर मजुरीसाठी जात होते.
स्थानिकांनीही बचावकार्यास मदत करत विहिरीमध्ये दोरखंड टाकून काहींना बाहेर काढले.
अपघातानंतर परिसरात मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी जमली आहे.
मृतांची संख्या वाढण्याची भीती असून, अधिकृत माहितीची प्रतीक्षा सुरू आहे.