पुण्यात गर्भवती महिलेचा पैशाअभावी दुर्दैवी मृत्यू; दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर गंभीर आरोप
पुणे: शहरातील प्रतिष्ठित दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर एका गर्भवती महिलेला वेळीच उपचार न दिल्याने
तिचा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप भाजपचे आमदार अमित घोडके यांनी केला आहे.
त्यांचे स्वीय सहाय्यक सुशांत भिसे यांच्या पत्नी तनिषा भिसे (वय २९) यांना २९ मार्च रोजी रक्तस्त्रावाच्या
Related News
पावसाळ्यात चुकूनही असे मासे खाऊ नका! फूड पॉइझनिंगचा धोका वाढू शकतो; जाणून घ्या कोणती काळजी घ्यावी
Monsoon Health Tips: पावसाळा सुरू होताच ...
Continue reading
Donald Trump : युद्ध सुरू असतानाच भारताला मोठा धक्का? चाबहार बंदरावर हल्ल्याच्या दाव्यामुळे खळबळ; चीन-पाकिस्तानला फायदा होणार?
...
Continue reading
‘सिया संस्कारी आहे असं सांगून लग्न जमवलं’, केतन अग्रवालच्या वडिलांचा मित्तल कुटुंबावर गंभीर आरोप; चौकशीची मागणी
पुण्यातील लोहगडावर झालेल्या केतन अग्र...
Continue reading
तुम्ही पित असलेलं दूध शुद्ध आहे की भेसळयुक्त? ‘या’ 5 सोप्या चाचण्यांनी घरच्या घरी ओळखा दुधाची गुणवत्ता
दूध हे भारतीयांच्या दैनंदिन आहारातील एक महत्त्वाचे ...
Continue reading
साखरेशिवाय घरच्या घरी बनवा हेल्दी आणि टेस्टी फ्रूट सोडा; उन्हाळ्यात शरीराला मिळेल ताजेपणा आणि ऊर्जा
उन्हाळ्याची चाहूल लागताच शरीराला थंडावा देणाऱ्या आ...
Continue reading
Jayant Patil : ‘अजितदादांनंतर अर्थखातं सांभाळण्याची क्षमता जयंत पाटलांकडेच’; सुषमा अंधारे यांच्या वक्तव्याची राजकीय वर्तुळात चर्चा
राज्याच्या राज...
Continue reading
Dharashiv Politics : ओमराजे निंबाळकर यांच्या वाढदिवसाच्या बॅनरची जिल्हाभर चर्चा; कैलास पाटील यांच्यासोबतचा फोटो झळकल्याने राजकीय चर्चांना उधाण
धाराशिव : श...
Continue reading
Vivek Oberoi : ‘लोकांनी आवाज उठवणं ही लोकशाहीची ताकद’; सोनम वांगचुक यांच्या उपोषणावर विवेक ओबेरॉयची प्रतिक्रिया चर्चेत
पर्यावरणवादी आणि शिक्षणतज्ज्ञ ...
Continue reading
Hasan Mushrif : ‘महायुतीत असं करून चालणार नाही’; अर्थ खात्यावरून सुरू असलेल्या चर्चांवर हसन मुश्रीफ यांची स्पष्ट भूमिका
Hasan Mushrif : 'महाय...
Continue reading
तक्रारीनंतर रुग्णालयात दाखल करण्यात आले. तनिषा या सातव्या महिन्यात गर्भवती होत्या.
रुग्णालयातील डॉक्टरांनी उपचारासाठी २० लाख रुपयांचा अंदाज कुटुंबियांना दिला आणि तत्काळ १० लाख
भरल्याशिवाय उपचार सुरु न करण्याचा निर्णय घेतला. कुटुंबाने अडीच लाख रुपये तत्काळ देण्याची तयारी दर्शवली,
मात्र रुग्णालय प्रशासनाने नकार दिला. त्यामुळे भिसे कुटुंबीयांनी तनिषा यांना दुसऱ्या रुग्णालयात नेण्याचा निर्णय घेतला.
वाकड येथील रुग्णालयात त्यांनी जुळ्या मुलींना जन्म दिला, मात्र रक्तस्राव वाढल्याने तनिषा यांचा मृत्यू झाला.
भाजप आमदार अमित घोडके यांनी ही बाब विधान परिषदेत मांडण्याचा इशारा दिला असून,
“आरोग्य व्यवस्थेचं हे अपयश लाजिरवाणं आहे” अशी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
तर, या घटनेनंतर विरोधी पक्षनेते संजय राऊत यांनीही तीव्र प्रतिक्रिया देत सरकारवर टीकेची झोड उठवली आहे.
सध्या पोलिसांनी तपास सुरू केला असून,
रुग्णालयातील CCTV फुटेज, संबंधित डॉक्टर आणि नर्सेसचे जबाब घेतले जात आहेत.
अहवाल आरोग्य विभागाकडे सादर केला जाणार आहे.