अकोट: अकोट तालुक्यातील लाडेगाव येथील शेतकऱ्याला, देवीदास येऊल यांना शेतात जाण्यासाठी रस्ता नव्हता. त्यामुळे पेरणी रखडली होती आणि शेतीचे नियोजन कोलमडले होते.शिकायत मिळाल्यावर अकोटचे नायब तहसीलदार नरेंद्र सोनवणे यांनी कार्यकारी दंडाधिकारी म्हणून घटनास्थळी ताबडतोब पोहोचून शेताचे निरीक्षण केले. शेतकऱ्याच्या अडचणी ऐकून तात्काळ निर्णय घेतला गेला. संबंधित पक्षकारांना बोलावून त्यांच्या बाजू ऐकून, घटनास्थळीच तात्पुरते न्यायालय भरवले गेले आणि अडवलेला रस्ता ताबडतोब खुला करण्यात आला.यामुळे शेतकऱ्याला शेतीसाठी आवश्यक मार्ग उपलब्ध झाला आणि पेरणीसाठीची अडचण दूर झाली. या कार्यवाहीसाठी उपविभागीय अधिकारी मनोज लोणारकर, तहसीलदार डॉ. सुनील चव्हाण, मंडळ अधिकारी चौबे, तलाठी रेखा गुजरकर आणि महसूल सहायक मंगेश गिल्ले यांनी सक्रिय सहकार्य केले.देवीदास येऊल म्हणाले, “आम्ही अनेक वेळा दारं ठोठावली, पण आज नरेंद्र सोनवणे साहेबांनी जे काम केलं ते आमच्यासाठी आशेचा किरण ठरला. आता आमची पेरणी वेळेत होणार आहे.”नरेंद्र सोनवणे यांची कार्यपद्धती केवळ कायदेशीर चौकटीत नाही तर मानवी संवेदना आणि सामाजिक बांधिलकीने प्रेरित आहे.
read also : https://ajinkyabharat.com/dhodap-shahet-teacher-amol-ambore-yancha-bhavnik-palan/