आऊट ऑफ सिलॅबस’चे नागपुरात जोरदार प्रमोशन -सामाजिक क्षेत्रासह शिक्षण, उद्योग, पत्रकारिता, चित्रपट क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती

आऊट ऑफ सिलॅबस

नागपूर, दि.13 प्रतिनिधी
अदु-तिशू प्रॉडक्शन्स अँड म्युझिक प्रस्तुत चित्रपट ‘आऊट ऑफ सिलॅबस… पुस्तकांच्या पलीकडे’चे नागपुरात धूमधडाक्यात प्रमोशन पार पाडले. सामाजिक क्षेत्रासह शिक्षण, उद्योग, पत्रकारिता आणि चित्रपट क्षेत्रातील मान्यवरांची याप्रसंगी उपस्थिती होती.

पर्यावरणाविषयी जागृत असलेले डॉ. सुगत वाघमारे यांची निर्मिती असलेला एका वेगळ्या धाटणीचा चित्रपट ‘आऊट ऑफ सिलॅबस… पुस्तकांच्या पलीकडे’चे प्रमोशन येथील रामदास पेठेतील हॉटेल सेंटर पॉइंट येथे आयोजित करण्यात आले होते़ याप्रसंगी ज्येष्ठ संपादक विजय फणशीकर, डॉ. सुगत वाघमारे, अ‍ॅड संजय सेंगर, झिंगल फिल्म्स अँड म्युझिक इंडिया प्रा.लि.चे मनोज तायडे, प्रा. डॉ. सुशांत सातपुतळे प्रामुख्याने उपस्थित होते.

आऊट ऑफ सिलॅबस...’चे निर्माते डॉ. सुगत वाघमारे चित्रपटाबद्दल माहिती देताना.

डॉ. सुगत वाघमारे यांनी चित्रपटाची मध्यवर्ती संकल्पना आणि निर्मितीमागील भूमिका सादर केली़ चित्रपटाची कथावस्तू ही ‘ग्लोबल वार्मिंग’या प्रमुख आणि जगाच्या अस्तित्वावर अनेक प्रश्नचिन्हे उभ्या केलेल्या चिंताजनक घटकांवर आधारित आहे़ विद्यार्थ्यांचा विविध विषयांगी अभ्यास आणि जागतिक तापमान अशा दोन प्रमुख बाबींचा धागा थेट परस्परांत गुंतलेला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मनोज तायडे यांनी पडद्यामागील काही माहिती सादर केली.

पंकज जगताप यांनी ‘आऊट ऑफ सिलॅबस’बाबत महत्त्वपूर्ण बाबी सांगितल्या़ तसेच, वृक्षांच्या अनन्यसाधारण महत्त्वाबद्दल पोवाडा सादर केला. सर्व मान्यवरांनी ‘आऊट ऑफ सिलॅबस’चित्रपटाला शुभेच्छा देत आपल्या भावना व्यक्त केल्या़ तसेच, सुयश चिंतिले.

प्रारंभी सर्व उपस्थितांचे डॉ. सुगत वाघमारे यांनी गुलाबपुष्प प्रदान करत स्वागत केले. कार्यक्रमाला ‘अजिंक्य भारत मीडिया’चे डॉ. प्रदीप अवचार, प्रशांत सोनोने, रवींद्र चुटे, धीरज साखरे, क्षितिजा पोतदार, मंदा खंडारे, कल्पना तेलंग, पंकज जगताप, रवींद्र डोंगरे, रोड राइट्स फाउंडेशनचे सचिव सतीश चावजी, संजय मुंदलकर आदींची उपस्थिती होती.

चित्रपट असा…

जमीन, वृक्ष, पाऊस अर्थातच पर्यावरणाविषयी जागृत करणार्‍या ‘आऊट ऑफ सिलॅबस’चे दिग्दर्शन दक्षिणेतील नवीन देशबोईना यांनी केले आहे. कथा-पटकथा अनिकेत कोरडे यांची असून, संगीत मोहित कुलकर्णी यांचे आहे़ उल्लेखनीय असे, की यात एक संस्कृत गीत सादर केले आहे़ तीन ते चार भाषांत निर्मित या चित्रपटात अभिनयसंपन्न कलाकारांनी भूमिका साकारली असून, नायक-नायिकेची नवी जोडी प्रत्यक्ष मोठ्या पडद्यावर 3 जुलै 2026 पासून पाहता येणार आहे. हा चित्रपट ‘पानोरामा स्टुडिओज’द्वारे सर्वत्र वितरित होत आहे.

read also : https://ajinkyabharat.com/akhand-congress-shocking-masterstroke-game-5-big-signs-delhi-earthquake-script-started/