ना बोनी, ना मिथुन! ‘या’ सुपरस्टारसाठी श्रीदेवीने ठेवला होता ७ दिवसांचा उपवास

ना बोनी, ना मिथुन! ‘या’ सुपरस्टारसाठी श्रीदेवीने ठेवला होता ७ दिवसांचा उपवास

बॉलिवूडमधील अतिशय सुंदर अभिनेत्री म्हणून श्रीदेवी ओळखली जाते. तिने बोनी कपूरशी लग्न केले होते.

पण तुम्हाला माहिती आहे का श्रीदेवीने बोनी कपूर ऐवजी दुसऱ्या अभिनेत्यासाठी जवळपास ७ दिवस उपवास केला होता.

आपल्या अभिनय आणि सौंदर्याने प्रेक्षकांची मने जिंकणारी बॉलिवूडमधील सुपरस्टार दिवंगत अभिनेत्री म्हणजे श्रीदेवी.

Related News

तिने बॉलिवूडचा एक काळ चांगलाच गाजवला होता.

श्रीदेवी तिच्या चित्रपटांसोबतच कायम खासगी आयुष्यामुळे चर्चेत राहिली आहे.

श्रीदेवीने जेव्हा विवाहित असलेल्या बोनी कपूर यांच्याशी लग्न केले तेव्हा सर्वांनाच धक्का बसला होता.

पण श्रीदेवीच्या आयुष्यात एक अभिनेता असा होता ज्याच्यासाठी श्रीदेवीने ७ दिवसांचा उपवास केला होता.

आता हा अभिनेता कोण असा प्रश्न तुम्हाला पडला असेल.

कर्नाटकातील एका सामान्य मराठी कुटुंबात जन्मलेल्या शिवाजी राव गायकवाड या अभिनेत्याबद्दल माहिती आहे का?

हा अभिनेता भारतीय चित्रपटसृष्टीचा सुपरस्टार आहे. ज्याला अनेक लोक देव मानतात. हा तोच अभिनेता आहे,

ज्याच्यासाठी श्रीदेवीने एकदा सात दिवस उपवास केला होता.

मिथुन चक्रवर्तीसह अनेक स्टार्ससोबत श्रीदेवीचे नाव जोडले गेले असले होते.

पण तिने बोनी कपूरसोबत लग्न केले. हा किस्सा फार कमी लोकांना माहीत आहे की

आणखी एक सुपरस्टार होता जो श्रीदेवीवर जीव ओवाळून टाकत होता.

आम्ही ज्या शिवाजी राव गायकवाडबद्दल बोलत आहोत ते दुसरे कोणी नसून दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत आहेत.

त्यांचे खरे नाव शिवाजी आहे. एक काळ असा होता जेव्हा रजनीकांत पोर्टरपासून बस कंडक्टरपर्यंत काम करत होते.

पण त्यांच्या नशिबात काही वेगळेच लिहिले होते. आज ते देशातील सर्वात मोठ्या सुपरस्टार्सपैकी एक आहेत.

रजनीकांत यांनी आजवर अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे.

त्यांनी आपल्या करिअरमध्ये अनेक सुपरस्टार महिलांसोबत काम केले आहे.

पण त्यांची आणि श्रीदेवीसोबतची केमिस्ट्री पाहण्यासारखी होती. दोघांनी तामिळ, तेलगू, कन्नड

आणि हिंदी अशा चार भाषांमधील १९ चित्रपटांमध्ये एकत्र काम केले होते.

आणखी एक मजेशीर गोष्ट म्हणजे श्रीदेवीनेही रजनीकांतच्या आईची

भूमिका साकारली होती. वास्तविक, तिचा पहिला चित्रपट ‘मुंद्रू मुदिचू’ होता.

ज्यामध्ये १३ वर्षांच्या श्रीदेवीने रजनीकांतच्या आईची भूमिका साकारली होती.

Read more news here : https://ajinkyabharat.com/hoi-special-gift-mahayati-sarkarchaya-decision-bahinicha-anand-dwiganit/

 

 

 

 

Related News