Ladki Bahin Holi Gift: लाडक्या बहिणींना साडी भेट देण्याचा निर्णय झाल्यानंतर राज्य यंत्रमाग
महामंडळाद्वारा अंत्योदय शिधापत्रिकाधारक कुटुंबांच्या यादीनुसार साड्यांचे गठ्ठे तयार केले.
प्रत्येक तालुक्यातील रेशन दुकानात पोहोचवण्यात येणार आहेत.
Related News
अधिक मासातील धार्मिक स्नान ठरले जीवघेणे; मुलाला वाचवताना आईचाही मृत्यू, समशेरपूर गाव शोकसागरात
अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यातील समशेरपू...
Continue reading
इराण युद्ध, होर्मुझ सामुद्रधुनीतील संकट आणि वाढत्या उत्पादनाच्या जोरावर अमेरिकेने अवघ्या 3 महिन्यांत जगातील सर्वात मोठा तेल निर्यातदार देश ...
Continue reading
नेपाळने भारतीय आंब्यांवर बंदी घातली नाही; केंद्र सरकारचा मोठा खुलासा, अफवांवर पूर्णविराम
गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडिया तसेच विविध माध्यमांमध्ये नेपाळने भारतीय
Continue reading
मूर्तिजापूरमध्ये एका विवाहित महिलेला व्हॉट्सअॅप व्हिडिओ कॉलवर अश्लील कृत्य दाखवून AI तंत्रज्ञानाच्या मदतीने बनावट व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देणाऱ्या तर...
Continue reading
मोठा दिलासा! विदर्भातील शाळा तब्बल 7 दिवस उशीरा सुरू; शिक्षण विभागाचा महत्त्वपूर्ण आणि दिलासादायक निर्णय
विदर्भातील वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर रा...
Continue reading
लंडनमध्ये मराठी कुटुंबाचा गूढ अंत; अदिती परळकर, राकेश पै आणि मुलगा सिड यांचा दुर्दैवी मृत्यू
लंडनमध्ये राहणाऱ्या भारतीय वंशाच्या एका मराठी कुटुंबाच्या गू...
Continue reading
Zojila Tunnel चा ऐतिहासिक ब्रेकथ्रू! 13 किमी लांबीचा बोगदा बदलणार लडाखचे भविष्य
Zojila Tunnel Breakthrough: 13 किमी लांबीचा आशियातील सर्वात शक्त...
Continue reading
सावधान! 100 रुपयांच्या नोटेमुळे होऊ शकते हजारोंची फसवणूक; व्हायरल VIDEO ने उघड केला स्कॅम
सावधान! 100 रुपयांच्या आमिषाने हजारोंची चोरी; चोरांची नवी ट्रिक पाहून तुम्हीही व्हाल सतर्...
Continue reading
‘तुंबाडची मंजुळा’ चित्रपटाच्या निमित्ताने अभिनेत्री सई ताम्हणकरने रील स्टार अथर्व रुकेचे भरभरून कौतुक केले. कंटेंट क्रिएटर्समुळे मराठी सिनेमा Gen Z...
Continue reading
उन्हाळ्यात वजन कमी करायचे आहे? आहारात समाविष्ट करा सत्तूपासून बनणारे हे 6 पौष्टिक पदार्थ
उन्हाळ्यात शरीराला थंडावा देणारे आणि आरोग्याला पोषक ठरणारे पदार्थ खाण्याकडे अनेकांचा कल अस...
Continue reading
केरळ कार अपघातातील हृदयद्रावक कहाणी; ऐनवेळी कार बदलल्याने 6 वर्षीय मुलगी बचावली, पती-पत्नीसह तिघांचा मृत्यूकोझिकोड/दुबई : आयुष्यातील काही क्षण असे...
Continue reading
‘Peddi’ची बॉक्स ऑफिसवर दमदार घोडदौड; अवघ्या चार दिवसांत 233 कोटींचा टप्पा पार
दाक्षिणात्य सुपरस्टार राम चरण आणि अभिनेत्री जान्हवी कपूर यांची प्रमुख भूमिका असलेला ‘
Continue reading
Antyodaya Ration Card: महायुती सरकारने लाडक्या बहिणींवर लक्ष केंद्रीत केले आहे.
तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महिलांना परिवहन महामंडळाच्या बसेसमधून अर्ध्या तिकिटावर प्रवास करण्याची योजना आणली.
त्यानंतर विधानसभा निवडणुकीपूर्वी लाडकी बहीण योजना आणत १५०० रुपये महिलांच्या खात्यात देणे सुरु केले.
त्यामुळे महिलांनी विधानसभा निवडणुकीत महायुतीला भरभरुन मतदान केले.
आता महायुतीच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारनेही महिलांवर लक्ष केंद्रीत केले आहे.
होळीच्या निमित्ताने रेशन दुकानातून साड्यांचे वाटप होणार आहे. अंत्योदय शिधापत्रिकाधारक महिलांना
साड्या दिल्या जाणार आहे. त्यासंदर्भातील आदेश राज्याच्या पुरवठा विभागाने काढले आहेत.
लाडक्या बहिणींना साडी भेट देण्याचा निर्णय झाल्यानंतर राज्य यंत्रमाग महामंडळाद्वारा अंत्योदय
शिधापत्रिकाधारक कुटुंबांच्या यादीनुसार साड्यांचे गठ्ठे तयार केले. प्रत्येक तालुक्यातील रेशन दुकानात पोहोचवण्यात येणार आहेत.
होळीपर्यंत प्रत्येक लाभार्थी कुटुंबांना एक साडी दिली जाणार आहे.
अशी मिळणार साडी
लाभार्थी महिलांनी रेशन दुकानात जाऊन ई-पॉस मशीनवर अंगठा ठेवल्यानंतर त्यांना एका कार्डवर एक साडी दिली जाणार आहे.
राज्याच्या सहकार, पणन आणि वस्त्रोद्योग विभागातर्फे यावर्षीही अंत्योदय गटातील प्रत्येक शिधापत्रिकाधारक महिलांना मोफत साडी देण्यात येणार आहे.
जळगावात सणापूर्वी साडी मिळणार
जळगाव जिल्ह्यात रेशन दुकानावर अंत्योदय शिधापत्रिका असलेल्या कुटुंबातील १ लाख ३५ हजार ३०२ महिलांना होळी सणापूर्वीच साडी मिळणार आहे.
अन्नधान्य पुरवठा विभागाच्या माध्यमातून ग्रामीण व शहरी भागातील सर्व रेशन दुकानांवर अंत्योदय
कार्डधारकांच्या संख्येनुसार साड्या उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत, अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी गायकवाड यांनी दिली.
महिलांनी होळी निमित्त साडी मिळणार असल्यामुळे लाडक्या बहिणी आनंदात आहे. परंतु साडीचा दर्जा चांगला असावा,
अशी अपेक्षा महिलांकडून व्यक्त केली जात आहे. महिलांना त्यांच्या आवडत्या रंगाच्या आणि चांगल्या
दर्जाच्या साड्या मिळतील की सरसकट एकाच प्रकारच्या साड्या मिळणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
Read more news here : https://ajinkyabharat.com/akot-railway-stationer-yuvakacha-durudaivi-death-suicide/