अकोला, ता. १७ एप्रिल — मुर्तीजापुर तालुक्यात गेल्या काही आठवड्यांपासून सुरू असलेल्या चोरीच्या
घटनांनी नागरिकांना अक्षरशः हैराण करून टाकले आहे. मात्र आता या चोरीच्या
सत्राला लगाम घालण्यासाठी नागरिक स्वतः पुढे सरसावले असून,
Related News
अलीगढमधील हॉटेलमध्ये देवतांच्या चित्रांसह नॅपकिन दिल्याने गोंधळ;
पाच वर्षांनंतर कैलास-मानसरोवर यात्रेला पुन्हा सुरूवात;
चंदननगरमध्ये तरुणाचा निर्घृण खून
पातूर शहरात ‘रान कसायांची’ टोळी सक्रिय
अकोल्यात गुड फ्रायडे भाविकतेने साजरा;
एका महिन्याच्या चिमुरडीची निर्घृणपणे हत्या….
काही सेकंदांची चूक आणि आयुष्य संपलं…
जय श्री राम ग्रुप द्वारा गौसेवा कार्य
ईस्टर संडेच्या तयारीने धार्मिक वातावरण भारावले
बीअरच्या बाटलीने ३६ वार:
चित्तौडगडमध्ये ‘द बर्निंग कार’! कलेक्ट्रेटजवळ उभी असलेली कार पेटली
“अंबाजोगाईत वकिल महिला बळी ठरली एका कटाचा?
रात्रपाळीच्या माध्यमातून गावांची सुरक्षा सुनिश्चित करण्याचा निर्धार केला आहे.
तालुक्यातील अनेक गावांमध्ये स्थानिकांनी संगठित होऊन स्वयंसेवकांच्या
गटांमार्फत रात्रभर गस्त घालण्याची मोहीम सुरू केली आहे.
या गस्तीदरम्यान काही संशयास्पद हालचाली करणाऱ्या व्यक्तींचा पाठलाग करत काही
चोरट्यांना ताब्यात घेण्यात नागरिकांना यश आले असून, त्यांना तात्काळ पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
काही चोरटे मात्र अंधाराचा फायदा घेत पळून जाण्यात यशस्वी झाले.
या मोहिमेमुळे पोलिस प्रशासनालाही मोठा दिलासा मिळाला असून,
नागरिक आणि पोलिस यांच्यातील समन्वयामुळे चोरट्यांमध्ये धास्तीचे वातावरण निर्माण झाले आहे.
पोलिसांनी नागरिकांकडून ताब्यात घेतलेल्या आरोपींविरोधात सखोल चौकशी सुरू केली आहे.
या आरोपींकडून शस्त्रसाठा देखील जप्त करण्यात आला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
पोलीस प्रशासनाने नागरिकांच्या या उपक्रमाचे कौतुक करत सर्व गावांना अशा प्रकारच्या
स्वयंप्रेरित सुरक्षाव्यवस्थेसाठी प्रोत्साहन दिले आहे. स्थानिक पातळीवर वाढलेल्या या सजगतेमुळे
चोरीच्या घटनांवर नियंत्रण मिळवण्यास मोठा हातभार लागणार असल्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/traditional-sheti-kartana-shetkyana-many-adchani/