मुर्तिजापूर नगरपरिषद निवडणूक 2025 – नाक्यावर वाहनांची तपासणी सुरू

मुर्तिजापूर नगरपरिषद निवडणूक

मुर्तिजापूर : नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 पारदर्शक, सुरक्षित आणि शांततेत पार पडावी यासाठी प्रशासनाकडून व्यापक तयारी सुरू आहे. आदर्श आचारसंहिता लागू झाल्यानंतर शहरातील सर्व महत्त्वाच्या प्रवेशबिंदूंवर स्थिर नियंत्रण पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे.

याच पार्श्वभूमीवर उडानपूल पॉईंट–दर्यापूर रोड या प्रमुख मार्गावर आज सकाळपासून वाहनांची तपासणी सुरू करण्यात आली आहे. तपासणीदरम्यान पोलिस कर्मचारी व उड्डाण पथकाचे अधिकारी मिळून वाहनांची डिक्की, केबिन, बॅग्ज तसेच संशयास्पद वस्तूंची सखोल तपासणी करत आहेत. निवडणूक काळात अवैध पैसे, दारू, मौल्यवान वस्तू किंवा मतदारांना आकर्षित करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या सामग्रीची वाहतूक रोखणे हा या कारवाईचा मुख्य उद्देश आहे.

माध्यम प्रतिनिधीही नाक्यावर उपस्थित राहून तपासणी प्रक्रिया पारदर्शक ठेवण्यात येत आहे. वाहनांची तपासणी, कागदपत्रांची चौकशी आणि संशयास्पद वस्तूंची पडताळणी यामध्ये पथक अत्यंत दक्षतेने काम करत आहे.

Related News

प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की तपासणीदरम्यान पोलिसांना पूर्ण सहकार्य करावे आणि परिसरात कोणतीही संशयास्पद हालचाल आढळल्यास त्वरित प्रशासनाला कळवावे. निवडणूक शांततेत आणि नियमबद्ध पद्धतीने पार पडणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे.

read also : https://ajinkyabharat.com/celebration-of-17th-birth-anniversary-of-pandit-jawaharlal-nehru-and-ustad-lahuji-at-district-school-khadka/

Related News