मुर्तिजापूर नगरपरिषद निवडणूक २०२५: स्थिर पथकाने केली रोख रक्कम जप्त

मुर्तिजापूर

मुर्तिजापूर – नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ साठी आदर्श आचार संहिता प्रभावीपणे अंमलात आणण्यासाठी स्थायी सर्वेक्षण पथक (SST पथक) तयार करण्यात आले आहे. मा. राज्य निवडणूक आयोगाने दि. ०४/११/२०२५ रोजी नगर परिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला असून त्यानंतर तात्काळ आदर्श आचार संहिता लागू झाली.

आज दिनांक १२/११/२०२५ रोजी सकाळी ७.१० वाजता स्थिर सर्वेक्षण पथक क्रमांक ४, आसरा फाटा नॅशनल हायवे, मुर्तिजापूर यांनी वाहन क्रमांक MH ३१ CR ८६१९ चालक योगेश अनिल कनोजे यांच्याकडून रु. २,३०,३००/- रोख रक्कम जप्त केली.

सदर कारवाई पथक प्रमुख चंदू महादेव तायडे व त्यांच्या पथकातील इतर कर्मचार्‍यांनी केली. रक्कम कशा हेतूने आणली आणि त्याचे पुरावे न दिल्यामुळे ती जप्त करण्यात आली. पथकाने पंचनामा तयार करून रक्कम जप्त केली असून पुढील कार्यवाही मा. निवडणूक निर्णय अधिकारी व उपविभागीय अधिकारी संदीपकुमार अपार, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी व नियंत्रण अधिकारी निलेश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली नोडल अधिकारी प्रसाद राठोड, वैभव ओहेकर, राजेश भुगुल तसेच आदर्श आचार संहिता अंमलबजावणी समिती करत आहे.

Related News

read also : https://ajinkyabharat.com/maha-e-seva-sangathans-enthusiastic-response-in-bandla-balapur/

Related News