मुंडगाव ग्रामपंचायतीचा घनकचरा व्यवस्थापन घोटाळा उघड – २७ लाखांचे बिल, पण काम गायब!

मुंडगाव ग्रामपंचायतीचा घनकचरा व्यवस्थापन घोटाळा उघड – २७ लाखांचे बिल, पण काम गायब!

मुंडगाव ग्रामपंचायतीचा घनकचरा व्यवस्थापन घोटाळा उघड – २७ लाखांचे बिल, पण काम गायब!

मुंडगाव ग्रामपंचायतीतील भ्रष्टाचारावर वरिष्ठांचे दुर्लक्ष!

अकोट शहर प्रतिनिधी | राजकुमार वानखडे

तालुक्यातील संत नगरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या मुंडगाव ग्रामपंचायतीने घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पासाठी

२७ लाख रुपयांचे बिल काढले असतानाही प्रत्यक्षात हे बांधकाम पूर्ण झालेले नाही,

Related News

असा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे. शासनाकडून या प्रकल्पासाठी लाखो रुपयांचे अनुदान मिळाले असतानाही

, २०२३ पासून आजपर्यंत काम अपूर्ण स्थितीत आहे.

ग्रामपंचायतीकडून भ्रष्टाचाराचा आरोप

ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, ग्रामपंचायतीने घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पासाठी निधी घेतला,

पण काम सुरू झाले नाही किंवा अपूर्ण सोडले गेले. विशेष म्हणजे, या भ्रष्टाचाराकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले आहे, यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी आहे.

ग्रामसेवकांचे स्पष्टीकरण – “बिल काढलेले नाही, पण काम अर्धवट”

संपर्क साधला असता ग्रामसेवक जाधव यांनी दावा केला की २७ लाख रुपयांचे बिल काढण्यात आले नाही. त्यांचा यावर खुलासा असा होता –

“ठेकेदाराने काम अर्धवट सोडले आहे. लवकरच दुसऱ्या ठेकेदाराला काम देऊन प्रकल्प पूर्ण केला जाईल.”

ग्रामस्थ व सदस्यांचा आरोप – अपूर्ण काम, निकृष्ट दर्जा

ग्रामपंचायतीच्या या कारभाराविरोधात ग्रामपंचायत सदस्य, उपसरपंच व नागरिकांनी आवाज उठवला आहे.

ग्रामपंचायत सदस्य नितीन गाडगे, उपसरपंच तुषार पाचकोर, माजी उपसरपंच विलास ठाकरे,

सामाजिक कार्यकर्ते हिरा सरकटे आणि अनेक ग्रामस्थांनी प्रशासनाकडे वारंवार तक्रारी केल्या.

“गेल्या दोन वर्षांपासून हे बांधकाम अपूर्ण अवस्थेत आहे. आम्ही गटविकास अधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती, पण कुठलीही चौकशी झाली नाही.

जर काम सुरू झाले नाही, तर आम्ही उपोषण करणार!”तुषार पाचकोर (उपसरपंच, मुंडगाव)

निकृष्ट दर्जाचे काम – स्मशानभूमी जवळच पडलेले टाकाऊ बांधकाम

गावातील स्मशानभूमी जवळच हे घनकचरा व्यवस्थापन केंद्र उभारले गेले होते, पण सध्या ते बंद पडलेल्या अवस्थेत आहे.

“बांधकाम निकृष्ट दर्जाचे आहे आणि वापरण्यायोग्य नाही.

तरीसुद्धा २७ लाखांच्या बिलाचा विषय ग्रामपंचायतीकडून लपवला जात आहे.”विलास ठाकरे (माजी उपसरपंच, मुंडगाव)

नागरिकांची मागणी – जिल्हा परिषदेने चौकशी करावी

यावर अकोला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यपालन अधिकारी बि. वैष्णवी यांनी तातडीने लक्ष घालावे,

अशी मागणी सुजाण नागरिकांनी केली आहे. अन्यथा गावकऱ्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.

मुंडगाव ग्रामपंचायतीतील घोटाळ्याची चौकशी होईल का? प्रशासन कोणती कारवाई करणार? याकडे सर्वांचे लक्ष आहे.

Related News