मुंडगाव ग्रामपंचायतीचे वीज कनेक्शन कट! नागरिकांमध्ये संतापाची लाट

कावळा माणसासारखा बोलायला लागला ! व्हायरल व्हिडीओने नेटकरी हैराण – Video

अकोट, प्रतिनिधी (राजकुमार वानखडे) – अकोट तालुक्यातील संत नगरी म्हणून ओळखल्या

जाणाऱ्या मुंडगाव ग्रामपंचायतचे वीज कनेक्शन गेल्या चार दिवसांपासून खंडित असून,

यामुळे ग्रामस्थांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

Related News

ग्रामपंचायत कार्यालयातील सर्व कामकाज ठप्प झाले असून,

नागरिकांना विविध प्रमाणपत्रांसाठी वारंवार हेलपाटे मारावे लागत आहेत.

५० हजारांची थकबाकी; कनेक्शन कट

ग्रामपंचायतच्या वीज बिलाची ५० ते ६० हजार रुपयांची थकबाकी असल्याने महावितरणने वीजपुरवठा खंडित केला आहे.

मात्र, ग्रामपंचायतीकडे महावितरणच्या करपोटी ८५ हजार रुपये बाकी असल्याचे ग्रामपंचायतीचे म्हणणे आहे.

ग्रामपंचायतीचे ग्राम सचिव गणेश जाधव यांनी सांगितले की, “विजेच्या थकबाकीबाबत

महावितरणकडे निवेदन सादर करण्यात आले आहे.

तरीही वीजपुरवठा खंडित करण्यात आला, ही अन्यायकारक बाब आहे.”

महावितरणचा दावा – “वारंवार सूचना देऊनही थकबाकी न भरल्याने कारवाई”

महावितरणचे उप अभियंता उद्देश शेंद्रे यांनी सांगितले की, “गेल्या अनेक वर्षांपासून वीज बिल थकले आहे.

वेळोवेळी ग्रामपंचायतीला सूचना देण्यात आल्या होत्या,

मात्र त्यांनी बिल न भरल्याने वीजपुरवठा खंडित करावा लागला.”

ग्रामस्थांमध्ये संताप; त्वरित वीज जोडणीची मागणी

ग्रामपंचायतीचे कामकाज ठप्प झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप असून,

वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तत्काळ लक्ष घालून वीज जोडणी करावी, अशी मागणी होत आहे.

अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.

Related News