मुंबई:
भारतातील पहिले आयकॉनिक आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनल मुंबईत सुरू झाले असून,
यामुळे मुंबई सागरी पर्यटनाच्या नव्या पर्वात प्रवेश करत आहे. सोमवारपासून हे टर्मिनल प्रवाशांच्या सेवेसाठी खुले करण्यात आले असून,
Related News
मान्सून अंदमानात दाखल! महाराष्ट्रात ६ जूनला होणार एंट्री
शोपियांमध्ये पहाटे अतिरेकी चकमक
पाकिस्तानचा खोटारडेपणा उघड
CBSE बारावी निकाल जाहीर,
“दहावीचा निकाल जाहीर,
“जो सिंदूर मिटवेल, तो मातीत मिसळेल…
चूकूनही करू नका ही एक चूक
‘याचना नाही आता रण होईल’
विराट कोहलीचा टेस्ट क्रिकेटमधून संन्यास
चंद्रपूरमध्ये वाघाची दहशत – ७२ तासांत ५ महिलांचा मृत्यू
“पहलगामपर्यंत पापाचा घडा भरला होता…
नीट ची तयारी करणाऱ्या दोन विद्यार्थ्यांची आत्महत्या
त्याचे उद्घाटन केंद्रीय बंदरमंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्या हस्ते करण्यात आले.
या टर्मिनलच्या माध्यमातून दरवर्षी 200 हून अधिक क्रूझ जहाजे आणि 10 लाखांहून अधिक
प्रवासी हाताळले जाणार आहेत. सुमारे 4.15 लाख चौरस फुटाच्या भव्य परिसरात
उभारलेले हे टर्मिनल म्हणजे आधुनिक सोयीसुविधांनी सज्ज सागरी पर्यटनाचा नवा चेहरा ठरणार आहे.
555 कोटींचा प्रकल्प, मुंबई पोर्टचा सिंहाचा वाटा
या भव्य प्रकल्पासाठी एकूण 555 कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला असून, त्यामधून 303
कोटी रुपये मुंबई पोर्ट प्राधिकरणाने तर उर्वरित 192 कोटी रुपये खासगी भागीदारांनी गुंतवले आहेत.
टर्मिनलची खास वैशिष्ट्ये:
-
एकूण क्षेत्रफळ: 4.15 लाख चौरस फूट
-
ऑपरेशनल स्पेस: 1.7 लाख चौरस फूट
-
हाताळणी क्षमता: दरवर्षी 10 लाख प्रवासी
-
जहाजे: 200+ क्रूझ जहाजांचे आगमन-निर्गमन
-
सोयीसुविधा: 22 लिफ्ट्स, 10 एस्केलेटर्स, 300 गाड्यांसाठी मल्टी-लेव्हल पार्किंग
-
अनुभवात्मक जागा: लक्झरी रिटेल, गॉरमेट डायनिंग, फास्ट इमिग्रेशन
रोजगाराची संधी आणि पर्यटनवाढीचा फायदा
या टर्मिनलमुळे मुंबईत हॉटेल, ट्रान्सपोर्ट, स्थानिक कलावंत, हस्तकला विक्रेते, टूर गाईड्स
यांच्यासाठी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होणार आहेत. सागरी अर्थव्यवस्थेला चालना मिळणार असून,
मुंबई हे शहर आंतरराष्ट्रीय सागरी पर्यटनाच्या नकाशावर अधिक ठळकपणे उभं राहणार आहे.
क्रूझ प्रवाशांमध्ये 400% वाढ
‘क्रूझ इंडिया मिशन’ अंतर्गत 2014 पासून क्रूझ प्रवाशांची संख्या 400 टक्क्यांनी वाढली आहे.
नव्या टर्मिनलमुळे ही वाढ आणखी गती घेणार आहे, अशी माहिती मुंबई पोर्ट ट्रस्टच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/punjabchaya-moga-shaharat-shocked-incident/