बंगळुरू :
डीआरडीओ (DRDO) स्टिकर लावलेली गाडी पाहून वायुसेनेतील विंग कमांडर आदित्य बोस
आणि त्यांच्या पत्नीवर एका दुचाकीस्वाराने हल्ला केल्याची धक्कादायक घटना बंगळुरू शहरात घडली आहे.
Related News
शिवसेना (उबाठा) मध्ये नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होणार
दोन कोटी विस लाखां च्या नावाखाली रुग्णसेवकाला सायबर गुंड्याकडून गंडवण्याचा प्रयत्न
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश
अतिक्रमण हटाव मोहीम का फक्त दुर्बळांवरच? अपंगाचे दुकान तोडले –
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारी
अकोल्यात विविध मागण्यांसाठी आज धरणे आंदोलन करणाऱ्यात आले
नवी दिल्लीतील भारत मंडपममध्ये पार पडलेल्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल
अखेर कातखेड,पिंपळखुटा गावात रस्त्याच्या कामाला सुरुवात
शेलुबाजार आरोग्य केंद्रात क्षयरुग्ण तपासणी शिबिर; डिजिटल एक्स-रेद्वारे ८७ संशयितांची तपासणी
पार्डी ताड–पिंपळखुटा रस्ता सहा महिन्यांतच खड्ड्यात! मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेवर प्रश्नचिन्ह
अखेर लेखी आश्वासनाने उपोषणाची मांघार!
दहीहंडा रोडवर मोठमोठे खड्डे; नागरिकांच्या सहकार्यातून काही खड्ड्यांची भर घाल
या हल्ल्यात विंग कमांडर बोस यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून, त्यांनी स्वतः व्हिडीओद्वारे हा सर्व प्रकार उघड केला आहे.
घटना कशी घडली?
विंग कमांडर आदित्य बोस आणि त्यांच्या पत्नी स्क्वाड्रन लीडर मधुमिता हे डीआरडीओ कॉलनीमधून
विमानतळाकडे जात होते. त्यावेळी एका दुचाकीस्वाराने त्यांची गाडी अडवली आणि कन्नड भाषेत
शिवीगाळ सुरू केली. त्यानंतर गाडीवरील DRDO स्टिकर पाहून त्याने आक्रमकपणे विचारले,
“तुम्ही DRDOचे लोक आहात का?“, आणि त्यानंतर स्क्वाड्रन लीडर मधुमिता यांना अपशब्द वापरले.
डोक्याला दुखापत, रक्तबंबाळ अवस्थेत अधिकारी
या अपमानासारखा प्रकार सहन न झाल्याने विंग कमांडर बोस गाडीतून खाली उतरले,
आणि त्यानंतर त्या दुचाकीस्वाराने त्यांच्यावर हल्ला केला. हल्ल्यात बोस यांच्या डोक्याला गंभीर जखम झाली
आणि ते रक्तबंबाळ अवस्थेत सापडले. त्यांनी नंतर स्वतःचा एक व्हिडीओ रेकॉर्ड करून संपूर्ण प्रकार सांगितला.
आजूबाजूच्या लोकांनीही दिल्या शिव्या?
या घटनेनंतर आजूबाजूचे काही लोक जमा झाले, मात्र मदत करण्याऐवजी त्यांनीही अपमानास्पद शब्द वापरले,
असा आरोप विंग कमांडर बोस यांनी केला आहे. या गोंधळात त्या व्यक्तीने एक दगड उचलून गाडीवर फेकला,
तो दगड थेट विंग कमांडर बोस यांच्या डोक्याला लागला.
पोलिसांकडे तक्रार; पण कारवाई नाही?
या घटनेनंतर दोघांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली, मात्र कोणतीही ठोस प्रतिक्रिया किंवा कारवाई
पोलिसांनी दिली नसल्याचे बोस यांनी सांगितले. “कर्नाटकातील ही परिस्थिती पाहून मला विश्वास बसत नव्हता,” असे ते म्हणाले.
पत्नीच्या धाडसामुळे जीव वाचला
विंग कमांडर बोस यांनी सांगितले की, “शुभं आहे की माझी पत्नी त्या वेळी माझ्यासोबत होती.
तिनेच प्रसंगावधान राखून मला वाचवलं.” त्यांनी असेही नमूद केले की सैन्य,
वायुदल आणि नौदलातील अधिकाऱ्यांसोबत जर अशा प्रकारची वागणूक होत असेल, तर ही अत्यंत गंभीर बाब आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/mumbaikaransathi-anandachi-baatmi/