‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत भारतीय हवाई दलाने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी
तळांवर मंगळवारी रात्री जोरदार हवाई हल्ला केला. या कारवाईत जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मसूद अजहर याच्या संपूर्ण कुटुंबाचा मृत्यू
झाल्याची माहिती समोर आली आहे. या धक्कादायक घटनेनंतर मसूद अजहरची पहिली प्रतिक्रिया देखील समोर आली असून,
Related News
अकोल्यात फटाके फोडून भारतीय सेनेला सलामी
अकोला जिल्ह्यात पुन्हा अवकाळी पावसाची हजेरी
अकोल्यात मुस्लिम बांधवांकडून ‘ऑपरेशन सिंदूर’च्या यशाचा जल्लोष; फटाके फोडून मिठाई वाटली
अकोल्यात शिवसेनेकडून सैनिकांना सलाम, लाडू वाटून जल्लोष
“ही कारवाई थांबू नये…” – ऑपरेशन सिंदूरवर शहीद लेफ्टनंट विनय नरवाल यांच्या पत्नी हिमांशी यांची भावुक प्रतिक्रिया
ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताची निर्णायक कारवाई;
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारताच्या लष्करी प्रतिउत्तराचे नेतृत्व महिलांच्या हाती…
‘ऑपरेशन सिंदूर’मागे एक सळसळती नायिका – कर्नल सोफिया कुरेशी!
पंतप्रधान मोदींकडून ‘ऑपरेशन सिंदूर’च्या यशस्वीतेसाठी तीनही सैन्यदलांचे कौतुक
‘ऑपरेशन सिंदूर’: पल्लनगाम हल्ल्याचा सूड, मोदींच्या प्रतिशोधाने दहशतवादाला हादरा
ऑपरेशन सिंदूरनंतर आणखी कारवाईची शक्यता?
ऑपरेशन सिंदूरनंतर भारताची स्पष्ट भूमिका; “मुंबई २६/११ नंतरचा सर्वात मोठा हल्ला”
“मीही मेलो असतो तर बरं झालं असतं,” असं तो म्हणाला असल्याचं सूत्रांकडून समजतंय.
भारतीय हवाई दलाने पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर देताना, मुझफ्फराबाद, कोटली,
बाग (PoK) आणि बहावलपूरमधील मुरीदके, अहमदपुरा शार्किया (पाकिस्तान) येथे दहशतवाद्यांच्या ९ तळांवर हल्ला चढवला.
या सर्जिकल स्ट्राईकमध्ये मसूद अजहरच्या कुटुंबातील १४ सदस्य ठार झाले.
यात त्याची पत्नी, मुलगी, भाऊ आणि बहिणींचा समावेश होता.
बहावलपूर हे मसूद अजहरचे मूळ गाव असून, जैश-ए-मोहम्मदचा मुख्य आधारस्थान तिथेच असल्याचे मानले जाते.
भारताच्या कारवाईमुळे जैश-ए-मोहम्मदला मोठा धक्का बसला आहे.
अजहरच्या प्रतिक्रियेमुळे त्याची मानसिक स्थिती आणि भारतीय हल्ल्याचा परिणाम स्पष्टपणे दिसून येतो.