विवाहितेला फुस लावून पळवून नेल्याप्रकरणी अकोट ग्रामीण पोलिसात तक्रार दाखल

विवाहितेला फुस लावून पळवून नेल्याप्रकरणी अकोट ग्रामीण पोलिसात तक्रार दाखल

विशाल आग्रे, शहर प्रतिनिधी अकोट

अकोट: तालुक्यातील आडगाव खुर्द येथील विवाहितेला अपहरण करून घरा शेजारी राहणाऱ्या अविनाश

दामोदर या युवकाने पळवून नेल्याची तक्रार गणेश रामकृष्ण ठाकरे यांनी अकोट

Related News

ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये दाखल केली आहे. गणेश ठाकरे यांची पत्नी नऊ मे रोजी तालुक्यातील

चंडिकापूर येथे काही कामानिमित्त गेली होती, परंतु त्या ठिकाणावरून ती घरी परत न आल्यामुळे

तिच्या पती व नातेवाईकांनी तिचा सर्वत्र शोध घेतला. नातेवाईक, मित्र तसेच परिसरात शोध घेऊनही पत्नी

आढळून न आल्याने अखेर हतबल झालेल्या पतीने अकोट ग्रामीण पोलिसात या संदर्भात तक्रार दाखल केली आहे.

दरम्यान पत्नी रूपाली गणेश ठाकरे हिला घराशेजारी राहणाऱ्या अविनाश दामोदर याने

भूलथापा देत फुस लावून पळवून नेल्याची तक्रार गणेश ठाकरे यांनी अकोट ग्रामीण पोलिस स्टेशनला दाखल केली असून,

याप्रकरणी सखोल चौकशीची मागणी तक्रारकर्ते अविनाश दामोदर यांनी केली आहे.

Read Also :  https://ajinkyabharat.com/famitra-netravakhalil-11-rarsh-vyaswi-migration-development-change-aani-dishani-amrit-yatra/

Related News