जालन्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मराठा कार्यकर्त्यांनी दाखवले काळे झेंडे

जालन्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मराठा कार्यकर्त्यांनी दाखवले काळे झेंडे

जालना:  शहरातील भोकरदन नाका परिसरात मराठा कार्यकर्त्यांनी अजित पवार यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवले आहेत.

मस्साजोग आणि परभणीच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर अखिल मराठा महासंघाच्या वतीने काळे झेंडे दाखवून निषेध करण्यात आला आहे.

अजितदादा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री झाले, याचा आम्ही निषेध करतो.

Related News

धनंजय मुंडे त्याच पक्षाचे मंत्री आहेत आणि त्याच पक्षाचे तिथे पालकमंत्री झाले.

म्हणून आमचा अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने याला विरोध आहे.

अजित पवार यांनी स्वतः पालकमंत्री पद न घेता दुसऱ्या पक्षाच्या मंत्राला पालकमंत्री पद द्यायला हवं होतं.

यासाठी आम्ही अजित दादांना आज काळे झेंडे दाखवून निषेध व्यक्त केल्याची प्रतिक्रिया मराठा आंदोलन अरविंद देशमुख यांनी दिली आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या Read Also : https://ajinkyabharat.com/akot-municipal-councils-dilapidated-building-is-on-the-verge-of-collapse-demanding-immediate-remedial-action/

Related News