मंगरुळपीर तहसिल येथे ‘महसुल दिन’ ऊत्साहात साजरा

मंगरुळपीर तहसिल येथे 'महसुल दिन' ऊत्साहात साजरा

दरवर्षी “महसूल दिन” हा दिनांक 1 ऑगस्ट रोजी व “महसूल सप्ताह” दिनांक 1 ते 7 ऑगस्ट या कालावधीत राज्यभर साजरा करण्यात येणार आहे.

वाशिम मंगरुळपीर मतदारसंघाचे आमदार श्यामभाऊ खोडे,ऊपविभागिय अधिकारी राजेंद्र जाधव,

तहसिलदार रविंद्र राठोड,ठाणेदार किशोर शेळके,गटविकास अधिकारी तसेच विविध शासकीय

अधिकारी यांच्या ऊपस्थीतीत महसुल दिन कार्यक्रमाचे ऊद्घाटन करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आले.

महसूल विभागाचे कार्य पारदर्शकपणे सादर करणे, नागरी सुविधा सुलभ करणे व जनतेच्या सहभागातून शासनाच्या विविध योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविणे,

या उद्देशाने मंगरुळपीर तालुक्यात “महसूल दिन” दिनांक 1 ऑगस्ट 2025 रोजी व “महसूल सप्ताह”

दिनांक 1 ते 7 ऑगस्ट 2025 या कालावधीत संपुर्ण मंगरुळपीर तालुक्यात साजरा करण्यात येणार आहे.

त्यानुसार महसूल विभागाचे कार्य नागरिकांपर्यंत पारदर्शक व प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी खालीलप्रमाणे उपक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे.

यामध्ये प्रथम दिनी महसुल विभागातील ऊत्कृष्ट कार्य करणार्‍या अधिकारी कर्मचार्‍यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

२ तारखेला अतिक्रमणाचे प्रश्न मार्गी लावणे,पाणंद आणी शेती रस्त्याच्या समस्या,डिबिटी संदर्भातील कार्यवाही,शासकीय जमीनीवरील

अतिक्रमणावरील कार्यवाही आणी शेवटी एम सॅन्ड कार्यवाही करुन या महसुल दिन सप्ताहाची सांगता होणार आहे.

महसुल हा शासनाचा कणा आहे,सर्व कर्मचार्‍यांनी ऊत्कृष्ट कार्य करुन शासनाच्या योजना शेवटच्या घटकांपर्यत पोहचवा

आणि प्रशासन पारदर्शी होईल याकरीता कार्य करा असे आवाहन महसुलदिनाच्या ऊद्घाटनप्रसंगी आमदार श्यामभाऊ खोडे यांनी केले आहे.

प्रतिनीधी:-फुलचंद भगत

मंगरुळपीर/वाशिम
मो.8459273206

Read Also : https://ajinkyabharat.com/ladki-bahin-yojnet-motha-scam-thousands-of-ineligible-beneficiaries-vasulichi-action/