“आदिवासी परंपरा हिच देशाची खरी संस्कृती” – रामकृष्ण ढिगर

"आदिवासी परंपरा हिच देशाची खरी संस्कृती" – रामकृष्ण ढिगर

आदिवासी परंपरा हिच देशाची खरी संस्कृती….

रामकृष्ण ढिगर क्रांतीकारी रेंगाआबा स्मारक लोकार्पण उत्साहात संपन्न अडगाव बु….

वार्ताहर लगतच्या आदिवासी भागातील धोंडाआखर येथे इंग्रजांच्या विरोधात आवाज उठवणारे

स्वातंत्र्य सेनानी जननायक रेंगाआबा यांच्या जयंती उत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते

परीसरातील बहुसंख्य आदिवासींच्या उपस्थितीत रेंगाआबा स्मारकाचे लोकार्पण संपन्न झाले.

उत्साहात पार पडलेल्या स्मारक लोकार्पण सोहळ्याचे अध्यक्षस्थानी माजी सभापती गोपाल कोल्हे ,

उद्घाटक विचारवंत रामकृष्ण ढिगर तर जयस महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष संदीप तोटा, विदर्भ अध्यक्ष ब्रिजेश गवते,

माजी उपसभापती किशोर मुंदडा, सामाजिक कार्यकर्ते हेमराज काळपांडे, माजी सरपंच दिनेश मावशे,

उपसरपंच संजय गावंडे, बाबाराव मावसकर यांचेसह मोठ्या संख्येने परीसरातील आदिवासी बांधवांची कार्यक्रमाला उपस्थिती होती.

आदिवासी युवकांचे प्रेरणास्थान असलेल्या रेंगाआबा यांनी त्या काळात युवकांनी समाज आणि देशासाठी समर्पित असले पाहिजे असा संदेश देऊन प्रेरीत केले होते .

तसेच त्यांनी आदिवासींच्या रुढी परंपरांना चालना दिली म्हणूनच आदिवासी परंपरा हिच देशाची खरी संस्कृती असल्याचे मत उद्घाटक विचारवंत

रामकृष्ण ढिगर यांनी स्मारक लोकार्पण प्रसंगी व्यक्त केले.

कार्यक्रमाचे संचालन सुरेश तायडे यांनी केले तर आभार प्रदर्शन अनिल मावशे यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रेंगाआबा जयंती उत्सव समिती चे नंदु दही,

अमर मावशे, रामगोपाल दही,लखन बेटे, संजय दही, नामदेव दही, मारोती मावशे यांनी अथक परिश्रम घेतले.

Read Also : https://ajinkyabharat.com/shaherat-besist-no-parking-june-middle-vehicle-bounted-karnayaar-wahtuk-branch-polisanchi-surgical-strike/