मनभा | २७ जून २०२५ –
२५ जूनच्या मध्यरात्रीपासून सुरू झालेल्या संततधार पावसामुळे मनभा परिसरातील शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे.
नद्या-नाले दुथडी भरून वाहत आहेत, तर अनेक शेतांमध्ये पाणी शिरल्याने उगवलेले अंकुराचे पीक पाण्याखाली गेले आहे.
Related News
गेल्या काही दिवसांपासून रिमझिम पावसानंतर अनेक शेतकऱ्यांनी खरिपाच्या पेरण्या सुरू केल्या होत्या.
काहींनी दमदार पावसाच्या प्रतीक्षेत तयारी ठेवली होती.
मात्र, मध्यरात्रीपासून झालेल्या धो-धो पावसामुळे नद्यांना पूर आला असून काही ठिकाणी बियाणं, खत वाहून गेलं आहे.
शेतकऱ्यांच्या कष्टावर पाणी फिरल्याने दुबार पेरणीची वेळ आली असून त्यात आर्थिक खर्चही वाढला आहे.
२६ जून रोजीही पेरण्या पूर्णतः अडकल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे.
शासनाने तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत जाहीर करावी, अशी मागणी परिसरातून जोर धरू लागली आहे.
