नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातअसलेल्या डोंगराळेतील आमरण उपोषण संपुष्टात; शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांनी दिले लेखी आश्वासन.

नाशिक

नाशिक प्रतिनिधी  : नाशिक येथील असलेल्या मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथे अल्पवयीन मुलीवरील अत्याचार आणि हत्येप्रकरणातील आरोपीस फाशीची शिक्षा व्हावी, या मागणीसाठी सुरू असलेले आमरण उपोषण अखेर समाप्त झाले. राज्याचे शालेय शिक्षण मंत्री व मालेगावचे पालकमंत्री माननीय दादाजी भुसे यांनी प्रत्यक्ष उपोषणस्थळी भेट देऊन उपोषणकर्त्यांच्या मागण्या शासनापर्यंत पोहोचवण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर उपोषणाची सांगता करण्यात आली.

29 डिसेंबर 2025 पासून हे आमरण उपोषण सुरू होते. चौथ्या दिवशी उपोषणकर्ते चंद्रकांत चैत्राम हिरे (वय 42) यांची प्रकृती अचानक बिघडली. चक्कर येऊ लागल्याने त्यांना तातडीने मालेगाव येथील सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून उपचार सुरू आहेत.

घटनेची गंभीर दखल घेत मंत्री दादाजी भुसे यांनी सोमवारी डोंगराळे येथे धाव घेतली. त्यांनी उपोषणकर्त्यांशी चर्चा करून त्यांच्या भावना जाणून घेतल्या. फाशीच्या शिक्षेची तीव्र मागणी लक्षात घेऊन त्या मागण्या शासनदरबारी पोहोचवण्याचे व त्यासाठी सातत्याने पाठपुरावा करण्याचे आश्वासन त्यांनी लेखी स्वरूपात दिले.

Related News

मंत्री महोदयांचे लेखी आश्वासन मिळाल्यानंतर उपोषणकर्त्यांनी आपले आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी मंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते लिंबू पाणी पाजून उपोषणाची सांगता करण्यात आली.

read also : https://ajinkyabharat.com/while-entering-the-house-of-the-newlyweds-should-they-know-the-secret-of-tandalacha-measure-or-vidhimagcha/

Related News