नागपूर हादरलं! स्फोटकं बनवणाऱ्या कंपनीत मोठा स्फोट.

नागपूर

नागपूर शहरालगत असलेल्या हिंगणा तालुक्यातील

धामणा येथे काल दुपारी एक वाजण्याच्या सुमारास

Related News

चामुंडी एक्सप्लोझिव्ह प्रायव्हेट लिमिटेड नावाच्या फटाका कारखान्यात मोठा स्फोट झाला.

यात सहा जणांचा मृत्यू झाला आहे तर अनेक जण जखमी झाले असून

त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, धामणा येथे

चामुंडी एक्सप्लोझिव्ह प्रायव्हेट लिमिटेड नावाचा फटाका कारखाना आहे.

रोजच्याप्रमाणे गुरुवारीही सर्व कर्मचारी कामासाठी दाखल झाले होते.

कारखान्याच्या पॅकेजिंग विभागात दुपारी एकच्या सुमारास आग लागली

तिथे गनपावडर असल्याने मोठा स्फोट झाला.

स्फोट झाला तेव्हा तेथे १० लोक काम करत होते.

हा स्फोट इतका भीषण होता की त्यात काम करणाऱ्या सहा जणांचा जागीच मृत्यू झाला

तर चार जण गंभीर जखमी झाले.

मृतांमध्ये चार महिला आणि दोन पुरुषांचा समावेश आहे,

प्रांजली मोद्रे (वय २२), प्राची फाळके (वय २०), वैशाली क्षीरसागर (वय २०),

मोनाली अलोने (वय २७) आणि पन्नालाल बंडेवार (वय ५०) अशी मृतांची नावे आहेत.

जखमींमध्ये शीतल चपट (वय ३०), दानसा मरसकोल्हे (वय २६),

श्रद्धा पाटील (वय २२) आणि प्रमोद चावरे (वय २५)

यांचा समावेश असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

ज्यातील चौघांची प्रकृती चिंताजनक आहे.

घटनेची माहिती मिळताच हिंगणा पोलिसांनी

तात्काळ बचाव पथकासह घटनास्थळी धाव घेतली.

मात्र ही आग कशी लागली हे अद्याप समजू शकलेले नाही.

ह्या स्फोटात सदर कारखान्याची भिंत तुटली असून

छतही उडून गेले असल्याची माहिती आहे.

अपघातानंतर घटनास्थळी एकच गोंधळ उडाला होता.

घटनेची माहिती मिळताच मृत व जखमींचे नातेवाईक घटनास्थळी दाखल झाले.

अपघातानंतर कंपनीचे व्यवस्थापक आणि मालक फरार झाले आहेत.

फटाका कारखान्यात स्फोट झाल्याची माहिती मिळताच

काटोलचे आमदार अनिल देशमुख आपल्या समर्थकांसह घटनास्थळी पोहोचले.

त्यांनी तेथे उपस्थित अधिकाऱ्यांना तातडीने मदतकार्याला गती देण्याचे आदेश दिले.

सदर दुर्घटनेची माहिती देताना नागपूरचे पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र सिंघल म्हणाले,

“धामना येथील स्फोटक बनवणाऱ्या कारखान्यात झालेल्या स्फोटात ६ जणांचा मृत्यू झाला असून,

५ जण जखमी झाले आहेत. पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले आहे.

मदतकार्य चालू आहे”.

Read also : पेमा खांडू सलग तिसऱ्यांदा अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री! (ajinkyabharat.com)

Related News