काल मकर संक्रांतीच्या दिवशी अकोला शहरात चायनीज मांजामुळे मोठी दुर्घटना

काल मकर संक्रांतीच्या दिवशी अकोला शहरात चायनीज मांजामुळे मोठी दुर्घटना

काल मकर संक्रांतीच्या दिवशी अकोला शहरात चायनीज मांजामुळे मोठी दुर्घटना घडली आहे. चायना मांजामुळे एका

व्यक्तीचा गळा चिरल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. नवीन पोलीस अधीक्षक कार्यालयाजवळील उड्डाणपूलावरून खाली उतरत

असताना किरण प्रकाश सोनोने या व्यक्तीचा गळा चायनीज मांजाने अडकल्याने हा दुर्दैवी प्रकार घडला.

शहरात पतंग उडवण्याच्या उत्साहामुळे वेगवेगळ्या ठिकाणी आणखी चारजण जखमी झाले आहेत. सर्व जखमींवर अकोला जिल्हा

शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनांमुळे शहरात चिंता आणि नाराजीचे वातावरण निर्माण झाले असून,

नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. आगामी दोन दिवसांपर्यंत चेहऱ्यावर रुमाल किंवा गमचा बांधून बाहेर

पडण्याचा सल्ला देण्यात आला आहे, तसेच चायनीज मांजाच्या वापरावर प्रतिबंध घालण्यासाठी कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या Read Also : https://ajinkyabharat.com/shri-sant-shankar-maharajs-death-anniversary-at-akolyatil-balapur-talukyatil-degaon/