पुण्यातील घटनेवर उपरोधिकपणे भाष्य करण्यासाठी आता पुणे काँग्रेसने भव्य राज्यस्तरीय निबंध स्पर्धेच आयोजन केलं आहे.
राज्य सरकारच्या कारभाराला टार्गेट करणं हा त्यामागे उद्देश आहे.
Related News
मुजफ्फरनगर (उत्तर प्रदेश),
उत्तर प्रदेशातील मुजफ्फरनगर येथे ११ जुलैपासून सुरू होणाऱ्या कांवड यात्रेमुळे दिल्ली-देहरादून
राष्ट्रीय महामार्ग व गंगा कालवा मार्गावर वाहतुक...
Continue reading
अकोला,
अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांसमोरील आर्थिक व व्यवस्थापकीय अडचणींमुळे आत्महत्येचे संकट दिवसेंदिवस वाढत चालले आहे.
यंदा केवळ जानेवारी ते जून २०२५ या कालावधीत ८० शेतकऱ्यांनी आत...
Continue reading
ठाणे |
मराठी हक्कासाठी निघालेल्या मोर्चात पोलिसांनी अडथळा आणल्याने मनसे नेते अविनाश जाधव यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
“आम्ही आतंकवादी आहोत की दहशतवादी?” असा थेट सवा...
Continue reading
चंदन जंजाळ
बाळापूर:- तालुक्यातिल निबां फाटा वर अवैद्य धंदे मोठ्या प्रमाणात जोर दरत आहे.
कुठे गावात तर कुठे शाळेच्या प्रणागणा तर काही ठिकाणी गावामध्ये गावठी दारु चे खुलेआम वि...
Continue reading
नवी दिल्ली | प्रतिनिधी
अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा BRICS देशांवर १० टक्के अतिरिक्त टॅरिफ लावण्याची धमकी दिली आहे.
"जो कोणी ब्रिक्सच्या अमेरिका-विरोधी ...
Continue reading
प्रतिनिधी आलेगांव
आषाढी एकादशी म्हणजे भक्ती, श्रद्धा आणि विठ्ठलनामाच्या गजराने भारलेला दिवस! याच दिवशी शेकापूर फाट्यावरील
कै. हरसिंग नाईक प्राथमिक आश्रम शाळा, श्री. सुधाकरराव...
Continue reading
आलेगाव दिनांक ५ प्रतिनिधी आलेगाव ते बाभुळगाव रस्त्यावरील कार्ला लगत रस्त्यावर मोठ,
मोठे खड्डे पडले असून जड वाहनांच्या दळण वळणाने सडकेच्या दोन्ही कडच्या कडा खचून १२ ते १८ इंचाचे
...
Continue reading
अकोला | प्रतिनिधी
आज दिनांक ७ जुलै २०२५ रोजी अकोला रेल्वे स्टेशन परिसरात हवामानामुळे अचानक निंबाच्या झाडाची मोठी फांदी
तुटल्याने झाडावर वास्तव्यास असलेले सुमारे ६० बगळे – पिल्ले ...
Continue reading
कुरणखेड - राष्ट्रीय महामार्गावर रोज अपघाताची मालिका सुरूच आहे बोरगाव मंजू पोलीस स्टेशनच्या हद्दीत येत .
असलेल्या राष्ट्रीय महामार्गावर डाळंबी जवळ आज दुपारी अपघात झाला यामध्ये का...
Continue reading
मुर्तिजापूर | शहरातील मध्यवर्ती बसस्थानकावर सोमवारी सकाळच्या सुमारास एक धक्कादायक घटना घडली.
मागून खाणाऱ्या व बेवारस अवस्थेत वावरत असलेल्या एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह थेट बसस्थ...
Continue reading
प्रतिनिधी | आकोलखेड
आषाढी एकादशीच्या शुभमुहूर्तावर अकोलखेड येथील श्री विठ्ठल मंदिरात गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळा उत्साहात पार पडला.
गुण गौरव सोहळा आयोजन समितीतर्फे आयोजित या ...
Continue reading
अकोला | प्रतिनिधी
अकोल्याच्या ऐतिहासिक आणि १३५ वर्षे जुन्या कच्छी मशीदने तंत्रज्ञानाशी जुळवून घेत एक अभिनव उपक्रम सुरू केला आहे.
'कच्छी मशीद अजान ॲप'च्या माध्यमातून अजान आता थेट...
Continue reading
पुण्यातील कोरेगाव पार्क येथील कल्याणीनगरमध्ये रविवारी रात्री दोनच्या आसपास मोठा अपघात झाला होता.
वेदांत अग्रवाल या अल्पवयीन मुलाने भरधाव वेगाने आपल्या पोर्ष गाडीने तरूण-तरूणीच्या बाईकला धडक दिली. या धडके दोघांचा जागीच मृत्यू झाला.
पुण्यातील हिट अँड रनच प्रकरण सध्या देशभरात गाजतय. एका बड्या बांधकाम व्यावसायिकाच्या मुलाने
दारुच्या नशेत बेदरकारपणे आलिशान पोर्शे कार चालवून दोघांना उडवलं. यात दुचाकीवरील तरुण-तरुणीचा मृत्यू झाला
. या प्रकरणात आरोपी अल्पवयीन असल्याने त्याची सुरुवातीला जामिनावर सुटका झाली होती.
शिक्षा म्हणून त्याला 300 शब्दांचा निबंध लिहायला सांगितला होता. या प्रकरणाने व्यवस्थेतील अनेक त्रुटी समोर आल्या आहेत.
आरोपीवर कठोर कलम लावली नाहीत, असं काहींच मत आहे. त्यातून पुणे पोलिसांवर देखील अनेक गंभीर आरोप झाले.
या प्रकरणात गुन्ह्याची माहिती वरिष्ठांना कळवली नाही, म्हणून दोन पोलीस अधिकाऱ्यांचे निलंबन सुद्धा करण्यात आले आहे.
एकूणच व्यवस्थेतील भोंगळ कारभार, आरोपी बड्या बापाचा मुलगा असेल, तर कायद्याला कसं वाकवता येतं,
हे या प्रकरणात दिसून आलय. त्यामुळे राज्यभरात जनतेच्या मनात संतापाची भावना आहे.
आता पुणे काँग्रेसने या प्रकरणावर उपरोधिकपणे भाष्य करण्यासाठी भव्य राज्यस्तरीय निबंध स्पर्धेच
आयोजन केलं आहे. 11 हजार 111 रुपयाच पहिलं बक्षीस ठेवण्यात आलं आहे.
विषय – माझी आवडती कार ( पॉर्शे , फरारी , मर्सिडीज,)
दारूचे दुष्परिणाम
माझा बाप बिल्डर असता तर ?
मी खरच पोलीस अधिकारी झालो तर ?
अश्विनी आणि अनिशचे मारेकरी कोण ?
आमदार रविंद्र धंगेकरांच्या हस्ते होणार बक्षीस वितरण
वयोमार्यदा 17 वर्ष ते 58 वर्ष
रविवारी सकाळी स्पर्धेच आयोजन
स्थळ – अपघात स्थळी बॉलर पब समोर कल्याणीनगर
ड्रायव्हरवर गुन्हा अंगावर घेण्यासाठी जबरदस्ती
या प्रकरणात धक्कादायक बाब म्हणजे मुख्य आरोपीला वाचवण्यासाठी त्याचे आजोबा सुरेंद्र अग्रवाल चालकावर दबाव टाकत होते.
ड्रायव्हरने गुन्हा त्याच्या अंगावर घ्यावा यासाठी जबरदस्ती सुरु होती. दोन दिवस ड्रायव्हरला डांबून ठेवल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.
अपघाताच्यावेळी पोर्श गाडी तू चालवत होता, असं पोलिसांना सांग. गुन्हा तुझ्या
अंगावर घे, विशाल अग्रवाल यांनी चालकाला त्यासाठी पैशांची ऑफर दिली.