महाराष्ट्रातील बाजार समित्यांसाठी पुणे येथे आधुनिक व्यवस्थापन प्रशिक्षण,शेतकऱ्यांना मिळणार अधिक फायदेशीर बाजारपेठ

महाराष्ट्रातील बाजार समित्यांसाठी पुणे येथे आधुनिक व्यवस्थापन प्रशिक्षण,शेतकऱ्यांना मिळणार अधिक फायदेशीर बाजारपेठ

ई-नाम,आंतरराज्यीय व्यापार,आर्थिक व्यवस्थापन आदी महत्त्वाच्या विषयांवर सखोल मार्गदर्शन

अकोट देवानंद खिरकर
महाराष्ट्रातील बाजार समित्यांना अधिक कार्यक्षम आणि आधुनिक बनवण्यासाठी राज्यातील ३०६

बाजार समित्यांमधील १६०० हून अधिक कर्मचाऱ्यांना विशेष प्रशिक्षण दिले जाणार आहे.सध्या काही कर्मचाऱ्यांसाठी

पुण्यात ‘यशदा’ येथे पाच दिवसीय प्रशिक्षण सुरू आहे.त्यामध्ये सध्या दुसऱ्या टप्प्यात 24 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारी यामध्ये प्रशिक्षण सुरू आहे.

Related News

ज्यामध्ये बाजार व्यवस्थापन,ई-नाम,आंतरराज्यीय व्यापार आणि प्रशासकीय सुधारणांवर भर दिला जात आहे.

बाजार समित्यांसाठी नवे दृष्टीकोन ठेऊन शेतीमालाची विक्री सुलभ करण्यासाठी आणि शेतकऱ्यांना पारदर्शक

बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी बाजार समित्यांचे आधुनिकीकरण आवश्यक झाले आहे.

या प्रशिक्षणाद्वारे ई-नाम प्रणालीचे प्रभावी कार्यान्वयन,आंतरराज्यीय व्यापाराचे नियोजन,

तक्रार निवारण प्रणाली,बाजार समित्यांचे आर्थिक व्यवस्थापन,आणि मनुष्यबळ व्यवस्थापन यांसारख्या महत्त्वाच्या घटकांवर भर दिला जात आहे.

तसेच,डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून ई-ट्रेडिंग,कमोडिटी एक्सचेंज आणि डेरिव्हेटिव्ह मार्केट्स,

शेतीमालासाठी गोदाम आणि शीतगृह साखळीचे महत्त्व, किमान आधारभूत किंमत (MSP) आणि कृषी-विपणन

संबंधित धोरणे यावर सखोल मार्गदर्शन दिले जात आहे.

चौकट

शेतकऱ्यांसाठी सुवर्णसंधी

शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला योग्य बाजारभाव मिळावा,दलालीशिवाय थेट विक्री करता यावी आणि त्यांच्या

उत्पादनांचे नुकसान टाळण्यासाठी गोदाम व शीतगृहांची सुविधा मिळावी,यासाठी या प्रशिक्षणातून बाजार समित्यांना

नवीन दिशा दिली जात आहे.यामुळे शेतकरी आधुनिक व्यापार प्रणालीशी जोडले जातील आणि अधिक फायदेशीर व्यवहार करू शकतील.

चौकट

बाजार समितींचा कारभार होणार अधिक पारदर्शक आणि सक्षम

या प्रशिक्षणानंतर राज्यातील बाजार समित्या डिजिटल प्रणालीचा प्रभावी वापर करतील,शेतमाल विक्री अधिक सुलभ होईल

आणि पारदर्शक व्यवहार वाढतील.शेतकऱ्यांना कमी खर्चात अधिक उत्पन्न मिळेल, त्यांचे उत्पादन योग्य दरात विकले

जाईल आणि त्यांना आधुनिक बाजारपेठेचा फायदा मिळेल.

कोड

कमोडिटी एक्सचेंज मध्ये सर्व शेतमालाचे व्यवहार होणे हे शेतकऱ्यांसाठी अतिशय फायद्याचे आहे.

शेतमालाच्या विक्री संदर्भात निर्णय घेण्याकरिता फ्युचर व ऑप्शन मार्केट हा चांगला पर्याय आहे.

बाजारभावातील तेजी मंदीचा शेतकऱ्यांना फटका बसू नये म्हणून फ्युचर व ऑप्शन मार्केटमध्ये शेतकऱ्यांचा सहभाग फायद्याचा आहे.

भविष्यामध्ये कशाप्रकारे भाव राहतील याचा अंदाज शेतकऱ्यांना येऊ शकतो

बाळ शशिधर खोटरे पुंडा.

कोड

शेतकरी हा केवळ उत्पादक न राहता स्मार्ट व्यापारी बनला पाहिजे.

पारदर्शक व्यवहार,योग्य बाजारभाव आणि तंत्रज्ञानाचा लाभ मिळाल्यासच त्याचे उत्पन्न वाढेल.या प्रशिक्षणामुळे बाजार समित्या सक्षम होतील

आणि शेतकऱ्यांना त्यांच्या मेहनतीचे योग्य मूल्य मिळेल.शासनाच्या या उपक्रमामुळे शेतकरी

स्वयंपूर्ण होऊन बाजारातील स्पर्धेत टिकू शकतील.पारंपरिक बाजार व्यवस्थेतील अडथळे दूर होऊन त्यांना अधिक स्वातंत्र्य आणि आर्थिक स्थैर्य मिळेल

सतीश बोंद्रे.

शेतकरी शिवपूर

कोड
बाजार समिती डिजिटल होणे ही काळाची गरज आहे.

डिजिटायझेशनमुळे त्यामध्ये पारदर्शकता येते. काळानुरूप आपण पारंपारिक पद्धती बाजूला ठेवून

अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर करणे जरुरी आहे.डिजिटायझेशनमुळे आपल्याला अचूक अंदाज येतो.

व्यापाऱ्यांमध्ये स्पर्धा वाढेल व शेतकऱ्यांना योग्य वेळी योग्य निर्णय घेण्यास मदत होईल व

शेतमालाला चांगला दर मिळेल त्यामुळे आपण अचूक व्यवस्थापन करू शकू.

प्रशांत पाचडे.

सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती अकोट.

Read more news here :https://ajinkyabharat.com/ratnagiri-nagpur-mahamarg-chaupat-mobdala-dilyashivay-jaminichi-mojani-nahi-mantana-taqi-ras-ras-ras-raju-shetty-aramad/

Related News