माणसं महत्त्वाची की कबुतरं? दादर कबुतरखाना प्रकरणी मनसेचा कोर्ट निर्णयाला पाठिंबा
मुंबई : दादर कबुतरखाना बंदी प्रकरणावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाला पाठिंबा देत मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी “माणसं महत्त्वाची की कबुतरं?” असा थेट सवाल उपस्थित करत जनआरोग्याला प्राधान्य देण्याची गरज अधोरेखित केली.
Related News
गेल्या काही दिवसांपासून कबुतरखान्यांवरून वाद निर्माण झाला आहे.
कबुतरांमुळे परिसरातील नागरिकांना गंभीर आरोग्य समस्या उद्भवत असल्याची अनेक उदाहरणं समोर आल्यानंतर मुंबई महापालिकेने कबुतरखाने बंद करण्याचा निर्णय घेतला.
त्यानुसार दादरचा प्रसिद्ध कबुतरखाना ताडपत्री लावून बंद करण्यात आला. या बंदीविरोधात दाखल केलेली विशेष रिट पिटीशन सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली असून आता अंतिम निर्णय मुंबई उच्च न्यायालय घेणार आहे.
पत्रकारांशी बोलताना बाळा नांदगावकर म्हणाले, “माणसांचं आरोग्य महत्त्वाचं की कबुतरं? कोर्टाने घेतलेला निर्णय योग्य आहे.
आम्ही त्याच्या बाजूने आहोत.” त्यांनी पुढे सांगितले की, “यात ८० ते ९० टक्के जैन समाज विरोधात आहे, कारण त्यांनाही आता नुकसान समजलं आहे.
एका डॉक्टरांनी याबाबत सांगितलेल्या आरोग्य धोक्यांची माहिती त्यांना मिळाली आहे. माणसांना प्राधान्य, आरोग्याची काळजी आणि पर्यावरणाचे रक्षण हेच महत्त्वाचे.”
या वक्तव्यामुळे दादर कबुतरखाना बंदी प्रकरणात मनसेने आपला ठाम पवित्रा स्पष्ट केला आहे.
Read also : https://ajinkyabharat.com/justice-yashwant-verma-case-loksabhet-impeachment-motion-approved/