वाहनात बेकायदेशीरपणे गॅस भरणे पडले महागात, गॅस सिलेंडरचा स्फोट, तिघांचा मृत्यू

भरताना सिलेंडरचा स्फोट झाला होता. त्या घटनेत १० जण गंभीररित्या भाजले गेले होते. त्यातील तिघांचा उपचार सुरु असताना निधन झाले.

Gas Cylinder explosion: जळगाव शहरातील इच्छादेवी चौकात घरगुती गॅसचा वापर खासगी वाहनात भरत असताना अचानक गॅस सिलेंडरचा स्फोट होवून दहा जण गंभीर जखमी झाले होते. जळगावात बेकायदेशीरपणे वाहनात गॅस भरताना स्फोट झाल्याच्या घटना नुकतीच घडली होती.

Jalgaon Fire Accident : बेकायदेशीर गॅस रिफिलिंग सेंटर सरार्स सुरु असल्याचा फटका सामान्य नागरिकांना बसला. जळगावात कारमध्ये बेकायदेशीरपणे गॅस भरताना सिलेंडरचा स्फोट झाला होता. त्या घटनेत १० जण गंभीररित्या भाजले गेले होते. त्यातील तिघांचा उपचार सुरु असताना निधन झाले.

पुणे, मुंबई, जळगावात उपचार

जळगाव शहरातील इच्छादेवी चौकात घरगुती गॅसचा वापर खासगी वाहनात भरत असताना अचानक गॅस सिलेंडरचा स्फोट होवून दहा जण गंभीर जखमी झाले होते. जळगावात बेकायदेशीरपणे वाहनात गॅस भरताना स्फोट झाल्याच्या घटना नुकतीच घडली होती. या घटनेतील जखमी तिघांचाही उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. जखमी 10 पैकी तिघांचा उपचार सुरू असताना वेगवेगळ्या ठिकाणी मृत्यू झाला. उर्वरित सात जखमींवर पुणे तसेच जळगाव येथे उपचार सुरू आहेत.

या तिघांचा मृत्यू

रिफिलिंग सेंटर चालक दानिश शेख, भरत सोमनाथ दालवाले व वाहन चालक संदीप सोपान शेजवळ अशी मयत तिघांची नावे आहेत. दोघांचा मुंबईत उपचार सुरू असताना तर एकाचा जळगावातील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार घेताना मृत्यू झाला. जळगाव जिल्ह्यात अनेक ठिकाणी अवैधपणे खाजगी वाहनांमध्ये गॅस भरण्याची केंद्र ठिकठिकाणी सुरू असून या दुर्घटनेनंतर आता तरी पोलीस संबंधितांवर कारवाई करणार का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Related News

स्वस्त गॅससाठी करतात हा पर्याय

घरगुती वापराचे गॅस सिलिंडरची किंमत कमी आहे. त्यामुळे वाहनांमध्ये हा गॅस भरण्याचा प्रकार अनेक ठिकाणी होत असतो. या गॅसचा वापर व्यावसायिक किंवा वाहनांसाठी करता येत नाही. त्यानंतरही काही हॉटेल, टपरी आदी ठिकाणी हे गॅस सिलिंडर वापरले जातात. तसेच वाहनांमध्ये भरले जातात. परंतु त्यांच्यावर पोलिसांकडून कारवाई होत नाही किंवा प्रशासनाकडूनही कारवाई होत नाही. त्यामुळे सर्वसामान्य लोकांना जीव गमवावा लागत आहे.

READ MORE

https://ajinkyabharat.com/amche-fish-food-stall-is-closed-sada-saravankaranwar-koli-woman-santapali-said-ladki-baheen/

Related News