“सुरेश धस यांचे महादेव मुंडे हत्येवरील गंभीर आरोप, पोलिसांचा हात असल्याचा दावा”
मोठी बातमी समोर येत आहे, आज भाजप आमदार सुरेश धस हे परळी दौऱ्यावर आहेत.
त्यांनी परळीमध्ये महादेव मुंडे यांच्या कुटुंबियांची भेट घेतली.
मोठी बातमी समोर येत आहे, आज भाजप आमदार सुरेश धस हे परळी दौऱ्यावर आहेत.
Related News
वडोदरा आणि आणंद जिल्ह्यांना जोडणारा महिसागर नदीवरील गंभीरा पूल अचानक कोसळला.
पुलावरून जात असलेली अनेक वाहने थेट नदीत कोसळली. या भीषण दुर्घटनेत तीन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आह...
Continue reading
कल्याण रेल्वे स्थानक परिसरातून फूस लावून एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर धावत्या एक्स्प्रेसमध्ये
लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
इगतपुरी त...
Continue reading
मुंबई,
उत्तर भारतीय फूड स्टॉल मालकावर मराठी न बोलल्यामुळे झालेल्या मारहाणीच्या वादानंतर मनसे प्रमुख
राज ठाकरे यांनी आपल्या पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना सक्त निर्देश दि...
Continue reading
बाळापूर :- कुठलीही वस्तू घेताना सर्वसामान्य माणूस बाजारांमधून प्लॅस्टिक पिशवी मध्ये वस्तू घेतात त्या प्लास्टिक
पिशवी मुळे प्लास्टिक कचऱ्या ने आपले व इतरांचे आरोग्य धोक्यात घालत ...
Continue reading
गावात मृत्यू म्हणजे केवळ शोक नाही,
तर एक त्रासदायक प्रवासाची सुरुवात होते.
नाल्याच्या दुर्गंधी पाण्यातून वाहत,
मृतदेहाला शेवटचा मुक्काम मिळतो.हिरपूर गावातील तरुण सुमित गाव...
Continue reading
मुजफ्फरनगर (उत्तर प्रदेश),
उत्तर प्रदेशातील मुजफ्फरनगर येथे ११ जुलैपासून सुरू होणाऱ्या कांवड यात्रेमुळे दिल्ली-देहरादून
राष्ट्रीय महामार्ग व गंगा कालवा मार्गावर वाहतुक...
Continue reading
अकोला,
अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांसमोरील आर्थिक व व्यवस्थापकीय अडचणींमुळे आत्महत्येचे संकट दिवसेंदिवस वाढत चालले आहे.
यंदा केवळ जानेवारी ते जून २०२५ या कालावधीत ८० शेतकऱ्यांनी आत...
Continue reading
ठाणे |
मराठी हक्कासाठी निघालेल्या मोर्चात पोलिसांनी अडथळा आणल्याने मनसे नेते अविनाश जाधव यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
“आम्ही आतंकवादी आहोत की दहशतवादी?” असा थेट सवा...
Continue reading
चंदन जंजाळ
बाळापूर:- तालुक्यातिल निबां फाटा वर अवैद्य धंदे मोठ्या प्रमाणात जोर दरत आहे.
कुठे गावात तर कुठे शाळेच्या प्रणागणा तर काही ठिकाणी गावामध्ये गावठी दारु चे खुलेआम वि...
Continue reading
नवी दिल्ली | प्रतिनिधी
अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा BRICS देशांवर १० टक्के अतिरिक्त टॅरिफ लावण्याची धमकी दिली आहे.
"जो कोणी ब्रिक्सच्या अमेरिका-विरोधी ...
Continue reading
प्रतिनिधी आलेगांव
आषाढी एकादशी म्हणजे भक्ती, श्रद्धा आणि विठ्ठलनामाच्या गजराने भारलेला दिवस! याच दिवशी शेकापूर फाट्यावरील
कै. हरसिंग नाईक प्राथमिक आश्रम शाळा, श्री. सुधाकरराव...
Continue reading
आलेगाव दिनांक ५ प्रतिनिधी आलेगाव ते बाभुळगाव रस्त्यावरील कार्ला लगत रस्त्यावर मोठ,
मोठे खड्डे पडले असून जड वाहनांच्या दळण वळणाने सडकेच्या दोन्ही कडच्या कडा खचून १२ ते १८ इंचाचे
...
Continue reading
त्यांनी परळीमध्ये महादेव मुंडे यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. यावेळी महादेव मुंडे यांचं कुटुंब चांगलंच भावुक झालं.
सुरेश धस यांनी पुन्हा एकदा जोरदार हल्लाबोल केला आहे. महादेव मुंडे यांचा मर्डर झाला त्याठिकाणीची गाडी जाते
आणि बॉडी जागेवर राहाते. भास्कर केंद्रे, सचिन सानप, गोविंद भताने या पोलिसांची
वारंवार या प्रकरणात नावं येतात, या प्रकरणात पोलिसांचा हात आहे का? असा सवाल यावेळी सुरेश धस यांनी उपस्थित केला आहे.
नेमकं काय म्हणाले सुरेश धस?
आकाच्या लोकांनी हा प्लॉट घेतला आहे, नेमका त्यांचा यात हात आहे का?
किड्या मुंग्यांसारखी लोक परळीत मारली जातात आणि हे म्हणतात परळीला बदनाम करत आहे.
आज पंधरा महिने झाले हत्येचा तपास उलगडत नाही, पोलीस तपासाला आहेत का कशाला?
परळीत या 35 लाख द्या आणि खून करा अशी परिस्थिती आहे. महादेव मुंडे यांचा प्लॉट ज्यांनी घेतला तो
प्लॉट नंतर कोणाच्या नावावर झाला हे पाहावे लागेल. या प्रकरणात चार पाच पोलिसांची नावे समोर येत आहेत.
भास्कर केंद्रे 15 वर्षे, सचिन सानप हे 10 वर्ष झाले इथेच आहेत. परळीतील पोलिसांनी खून झाल्यावर गाडी नेली
पण बॉडी तिथेच ठेवली. याचा अर्थ पोलिसांनीच त्यांना मारले कां?, असा सवाल सुरेश धस यांनी यावेळी उपस्थित केला आहे.
100 टक्के यात आकाचा संबंध आहे, किंवा मग पोलिसांनीच याला मारले.
रात्री 8 वाजता कोर्टासमोर महादेव मुंडे यांचा खून करण्यात आला. या प्रकरणात आकाच्या
आकाचा हात नसेल मात्र आकाचा हात नक्की असेल. असं म्हणत सुरेश धस यांनी
पुन्हा एकदा नाव न घेता वाल्मिक कराडवर निशाणा साधला आहे.
दरम्यान परळीमध्ये सुरेश धस यांना काळे झेंडे दाखवण्यात आले आहेत, आंदोलन करण्यात आलं.
सुरेश धस हे परळीला बदनाम करत आहेत, असा आरोप आंदोलकांनी यावेळी केला आहे.
Read more news here : https://ajinkyabharat.com/obc-mahasanghcha-sub-officer-office-request/