अकोला, दि. २४ : राज्य बियाणे महामंडळाच्या पैलपाडा येथील संशोधन केंद्र,
तसेच सेंटर ऑफ एक्सलन्स येथे संशोधित झालेल्या संकरित बीटी कपाशी
महाबीज 124 चे सहविपणन अंतर्गत संकरित बीटी कपाशी ‘महाबीटी बीजी दोन’ या वाणाचे लोकार्पण करण्यात आले.
Related News
सात महिने जुनी तक्रार दुर्लक्षित! मयुरीच्या आईने महिला आयोगाला लिहिलं होतं पत्र
“फायदा करून देणार 100 टक्के…”
EPFO चा 7 कोटी सदस्यांना गिफ्ट;
कान 2025 : आलिया भट्टच्या ड्रेसची मल्लिका शेरावतच्या गाऊनशी तुलना;
पुण्यातील बनावट कॉल सेंटरवर मोठी कारवाई;
“केंद्र आणि राज्यांनी टीम इंडियासारखे एकत्र काम केल्यास कोणतंही उद्दिष्ट कठीण नाही”
अकोट तालुक्यात परवानाधारक दुकानदारांना जून ते ऑगस्ट 2025 पर्यंतचे अन्नधान्य उपलब्ध;
किरीट सोमय्या हेच एक भोंगा – हर्षवर्धन सपकाळ….
हवामान खात्याकडून मान्सूनचा – डबल अटैक जारी !
21 वर्षीय तरुणाचा मृत्यू, पुन्हा एकदा सतर्कतेची गरज!
15 वर्षांनंतर सर्वात लवकर आगमन
अकोल्यात शिवसेना ठाकरे गटाकडून जीवन प्राधिकरणाच्या कार्यालयात तोडफोड…
हे वाण हे उच्च उत्पादन क्षमतेचे असून कोरडवाहू क्षेत्रासाठी वरदान ठरणार आहे,
असा विश्वास महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक योगेश कुंभेजकर यांनी व्यक्त केला.
महाबीज संशोधित तूर बियाण्याचेही यावेळी लोकार्पण करण्यात आले.
तुरीचे एमपी व्ही 106 या जातीचे बियाणे दक्षिण भारतासाठी प्रसारित करण्यात आले आहे.
या वाणाची उत्पादन क्षमतासुद्धा उत्कृष्ट आहे. बियाण्याची मागणी दक्षिण भारतातून तामिळनाडू व
कर्नाटक या राज्यातून प्राप्त झालेली आहे. बियाणे पुरवठ्याची संपूर्ण तयारी झालेली असून त्वरितच
या राज्यांना बियाण्याचा पुरवठा करण्यात येणार आहे. याप्रसंगी ‘महाबीज’चे संशोधन
व विकास कार्यामध्ये सहभागी असलेल्या सर्व अधिकारी कर्मचारी यांचे
डॉ. रणजीत सपकाळ यांनी अभिनंदन केले. महाबीजचे महाव्यवस्थापक विजय
देशमुख यांनी यावेळी महाराष्ट्रातील प्रत्येक भागातील बियाण्याची गरज
लक्षात घेऊन त्या त्या पद्धतीने महाबीज संशोधन व विकास करून त्याच पद्धतीचे
बियाणे शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यासाठी कटिबद्ध आहे, असे सांगितले.
इतर पिकातही आपण बियाण्याची गरज पाहून बियाण्याचे उपलब्धता करून देण्यात असल्याचेही त्यांनी सांगितले.
जिल्ह्यातील प्रगतीशील शेतकऱ्यांना प्रतिनिधिक स्वरूपात संकरित बीटी
कपाशी वाणाचे वितरण करण्यात आले. सर्व विभागप्रमुख उपस्थित होते.
सूत्रसंचालन महाबीजचे उपमहाव्यवस्थापक श्री गणेश जी डहाळे यांनी
केले तर कार्यक्रमाचे आभार डॉ. प्रफुल्ल लहाने यांनी मानले.
Read Also : https://ajinkyabharat.com/akolid-shiv-sena-thackeray-gatakdoon-life-authority-office-todfod/