लाखपुरी येथे महात्मा फुले जयंती उत्साहात साजरी

लाखपुरी येथे महात्मा फुले जयंती उत्साहात साजरी

लाखपुरी (ता. मुर्तिजापूर),

दि. १२ एप्रिल — लाखपुरी येथे थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

सिद्धार्थ बौद्ध विहार, बस स्टँड चौक येथे आयोजित कार्यक्रमात नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला.

Related News

महात्मा ज्योतिबा फुले (११ एप्रिल १८२७ – २८ नोव्हेंबर १८९०) हे महाराष्ट्रातील अग्रगण्य समाजसुधारक,

विचारवंत, लेखक आणि जातिव्यवस्थेविरोधात लढणारे क्रांतिकारक होते.

त्यांनी स्त्रियांसह मागासवर्गीयांना शिक्षणाचा अधिकार मिळवून देण्यासाठी आयुष्यभर संघर्ष केला.

कार्यक्रमाची सुरुवात महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करून झाली.

उपस्थित मान्यवरांनी त्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. या वेळी पत्रकार आकाश जामनिक,

पत्रकार गजानन गवई, ग्रामपंचायत सदस्य फिलिप जामनिक, ग्रामीण पत्रकार संघाचे मुर्तिजापूर

तालुकाध्यक्ष अतुल नवघरे यांच्यासह गावातील अनेक नागरिक उपस्थित होते.

अतुल नवघरे यांनी महात्मा फुले यांच्या कार्यावर सखोल भाष्य करत उपस्थितांना मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन आकाश जामनिक यांनी केले तर आभार प्रदर्शन गजानन गवई यांनी केले.

Related News