लाचखोरी भोवली; पोलिस कर्मचाऱ्यासह दलाल अटकेत.

लाचखोरी भोवली; पोलिस कर्मचाऱ्यासह दलाल अटकेत.

दहीहांडा पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या प्रकरणात कोणतीही कारवाई न करण्याच्या बदल्यात

८ हजार रुपयांची लाच स्वीकारल्याच्या आरोपावरून पोलिस शिपाइ प्रफुल्ल जनार्धन दिंडोकार

वय ३३ आणि दलाल शंकर जानराव तरोळे वय ६५ यांना अकोला लाचलुचपत

Related News

प्रतिबंधक विभागाने सायंकाळी अटक केली आहे.

तक्रारदाराने दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांच्या कुटुंबीयांविरुद्ध दहीहांडा पोलिस ठाण्यात संज्ञान

न घेण्यायोग्य (एनसी) प्रकरण दाखल करण्यात आले होते.

या प्रकरणात कोणतीही कारवाई न करता प्रकरण मिटविण्यासाठी पोलिस शिपाइ दिंडोकार याने

१० हजार रुपयांची मागणी केली होती. तडजोडीनंतर ही रक्कम ८ हजार रुपयांवर आली.

याप्रकरणी ‘एसीबी’ने तक्रारदाराची खातरजमा करून सापळा

रचला या सापळ्यात लाचखोर अलगद अडकले. ही कारवाई एसीबीचे पोलिस अधीक्षक

मारुती जगताप, अतिरिक्त पोलिस अधीक्षक सच्छिंद्र शिंदे यांच्या निर्देशानुसार करण्यात आली.

गेल्या तीन वर्षात अकोला जिल्ह्यात लाचलुचपत प्रकरणांमध्ये सात पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई झाली आहे.

२०२२ मध्ये तीन, २०२३ मध्ये एक, तर २०२४ मध्ये तीन जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले. २०२५ मधील ही पहिलीच कारवाई आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या Read Also : https://ajinkyabharat.com/muthi-baatami-mahakumbh-in-chhengrachengari-30-hoon-jastha-bhavik-jakhmi-amrit-snan-canceled/

Related News