ब्रिटनमध्ये लेबर पार्टी १४ वर्षांनंतर सत्तेवर!
शुक्रवारी ५ जुलै रोजी ब्रिटनमध्ये सत्तापरिवर्तन झाले.
सत्ताधारी कंझव्हेंटिव्ह पक्ष १४ वर्षांनंतर लेबर पार्टीकडून निवडणुकीत पराभूत झाला.
Related News
त्यानंतर काही तासांनी भारतीय वंशाचे ऋषी सुनक यांनी
पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला.
लेबर पार्टीचे ६१ वर्षीय कीर स्टार्मर हे देशाचे ५८ वे पंतप्रधान बनले आहेत.
सुनक यांनी पराभव स्वीकारत पक्षाची माफी मागितली आहे.
त्यांनी स्टार्मर यांना फोन करून विजयाबद्दल अभिनंदनही केले.
सार्वत्रिक निवडणुकीत लेबर पार्टीला दणदणीत विजय मिळाला आहे.
पक्षाने एकूण ६५० जागांपैकी ४१२ जागा जिंकल्या आहेत.
सरकार स्थापन करण्यासाठी ३२६ जागांची आवश्यकता आहे.
दुसरीकडे, कंझव्हेंटिव्हला १२० जागा कमी झाल्या.
कंझव्र्हेटिव्ह पक्षाचा गेल्या २०० वर्षांतील हा सर्वात मोठा पराभव आहे.
सुनक यांचा राजीनामा
ऋषी सुनक यांनी बकिंगहॅम पॅलेसमध्ये राजा चार्ल्स यांच्याकडे
राजीनामा सुपूर्द केला आहे.
चार्ल्सनेही तो स्वीकारला. बकिंगहॅम पॅलेसने याला दुजोरा दिला आहे.
देशाला मी प्रथम आणि सर्वात महत्त्वाचे सांगू इच्छितो की मला माफ करा.
मी माझ्या या कामासाठी माझे सर्वस्व दिले आहे,
परंतु तुम्ही स्पष्ट संकेत पाठवले आहेत की
युनायटेड किंगडमचे सरकार बदलले पाहिजे
आणि तुमचाच निर्णय महत्त्वाचा आहे.
या नुकसानीची जबाबदारी मी घेतो, असे सुनक म्हणाले.