क्रांतिसूर्य बिरसा मुंडा : जीवनकार्य व आदिवासी योगदानाची शाळांमध्ये केली महत्त्वपूर्ण ओळख

बिरसा मुंडा

बाळापूर, ताप्र: शनिवार, १५ नोव्हेंबर रोजी आदिवासी जननायक वीर बिरसा मुंडा यांची १५० वी जयंती तालुक्यातील विविध शाळांमध्ये उत्साहात साजरी करण्यात आली. या दिवशी शाळा, सामाजिक संस्था व विद्यार्थ्यांनी आदिवासी संस्कृती आणि जनजाती गौरव दिनाचे औचित्य साधून विविध उपक्रमांचे आयोजन केले.

पी.एम.श्री.भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी जि.प. आंतरराष्ट्रीय आदर्श शाळा, वाडेगांव (मुले), श्री बालाजी इंग्रजी शाळा आणि उर्दू माध्यमिक शाळा तसेच संपूर्ण तालुक्यातील शाळांमध्ये आदिवासी नेते वीर बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला हारार्पण करून पूजन करण्यात आले.

सदर कार्यक्रमात विद्यार्थ्यांना आदिवासी संस्कृती, आदिवासी समाजाचा इतिहास, जीवनशैली, खाद्यसंस्कृती आणि भारतीय समाजातील आदिवासी योगदानाबद्दल माहिती देण्यात आली. तसेच आदिवासी संगीत, लोकनृत्य, कथाकथन, वर्गचर्चा, व्याख्यान व लघुपटांचे आयोजनही करण्यात आले. शाळेतील शिक्षकांनी विद्यार्थ्यांना बिरसा मुंडा यांच्या जीवनकार्याचा सविस्तर परिचय दिला.

Related News

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गजानन कातखेडे सर यांनी केले तर आभार प्रदर्शनाची जबाबदारी कु. प्रणिता डंबाळे मॅडम यांनी सांभाळली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील शिक्षकवृंद, शा.व्य. समितीच्या अध्यक्षा व सर्व सदस्यांची मोलाची मदत लाभली.

अशा प्रकारे, आदिवासी नेते क्रांतिसूर्य बिरसा मुंडा यांच्या जयंती दिनाचे आयोजन उत्साहपूर्ण आणि भावनिक वातावरणात पार पडले, ज्यात विद्यार्थ्यांनी त्यांच्या जीवनातील संघर्ष व आदिवासी समाजासाठी केलेल्या योगदानाची सखोल जाण ठेवली.

read also : https://ajinkyabharat.com/on-the-last-day-of-the-akot-municipal-council-the-interested-peoples-lamb-rangach-ranga/

Related News