कोल्हापूर | ता. १७ एप्रिल —
“नाद करा पण कोल्हापूरकरांचं कुठं!” म्हणत कोल्हापूरकर फुटबॉलप्रेमींनी आपल्या
जल्लोषाचा अनोखा अंदाज दाखवला; मात्र यावेळी हा नाद थेट आयोजकांनाच महागात पडला.
Related News
बार्शीटाकळीतील साडेसात कोटींचा रस्ता दोन महिन्यात उखडला;
ओडिशात ५वी व ८वीच्या विद्यार्थ्यांसाठी पास-फेल पद्धत पुन्हा लागू;
बार्शीटाकळीच्या कन्येचा आंतरराष्ट्रीय स्तरावर अभिमानास्पद सन्मान
“गुरुपौर्णिमेला शिंदेंची दिल्ली वारी, शाहांच्या चरणांवर टीका” – संजय राऊतांचा हल्लाबोल
सर्पदंश झालेल्या युवा शेतकऱ्याला पिंजर ते अकोला 40 मिनटातच केले रुग्णालयात दाखल
विद्यार्थ्यांनी इंडियन टॅलेंट ओलंपियाड परीक्षेमध्ये घवघवीत यश
शिष्यवृत्ती मिळण्यासाठी फरहान अमीन यांचा पुढाकार; मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडून आश्वासन
पोलीस अधीक्षक मा. अर्चित चांडक यांच्या हस्ते विद्यार्थिनींचा गौरव.
कापूस खरेदी व ज्वारी खरेदी घोटाळ्याची sit चौकशी होणार
पोस्टे खदान पोलिसांची मोठी कामगिरी – ११ घरफोड्यांचे गुन्हे उघड, १४.३२ लाखांचा मुद्देमाल जप्त
कोलवड गावात दुर्दैवी घटना :
बीडमध्ये धक्कादायक घटना: दफनविधीवेळी मृत घोषित केलेलं नवजात बाळ निघालं जिवंत!
फुटबॉलच्या सामन्यात बक्षीस म्हणून जिवंत बकरी प्रेक्षक गॅलरीत आणल्याचा अनोखा प्रकार समोर
आल्याने प्रेक्षकांपासून पंचांपर्यंत सगळेच चक्रावून गेले.
परिणामी आयोजकांवर पाच हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
कोल्हापुरातील ऐतिहासिक आणि प्रतिष्ठेची मानली जाणारी उत्तरेश्वर चषक फुटबॉल स्पर्धा सध्या रंगतदार स्वरूपात सुरू आहे.
या पार्श्वभूमीवर खंडोबा तालीम मंडळ आणि संयुक्त बुधवार पेठ यांच्यात अंतिम लढत रंगली होती.
प्रेक्षकांची गॅलरी खचाखच भरलेली असताना, बुधवार पेठच्या एका जल्लोषी
समर्थकाने आपल्या टीमसाठी बक्षीस म्हणून चक्क जिवंत बकरीच घेऊन गॅलरीत हजेरी लावली!
खेळ थबकला, पंचही गोंधळले
बकरी पाहताच प्रेक्षकांमध्ये हशा आणि गोंधळाचं वातावरण तयार झालं.
काही क्षणांसाठी सामना थांबवावा लागला. आयोजकांनाही परिस्थिती हाताळण्यात अडचणी आल्या.
हा प्रकार फुटबॉलच्या नियमबाह्य असल्याने कोल्हापूर स्पोर्ट्स
असोसिएशनने त्वरित दखल घेत स्पर्धा संयोजक बालगोपाल तालीम मंडळ यांच्यावर ₹५,००० चा दंड ठोठावला.
फुटबॉलचा जल्लोष की गोंधळ?
कोल्हापूरमध्ये फुटबॉल ही केवळ एक स्पर्धा नसून, संस्कृतीचा भाग मानली जाते.
९० वर्षांची ही परंपरा आजही उत्साहात सुरू आहे. मात्र,
उत्साहाच्या भरात केलेल्या अनोख्या प्रकारांनी आता संयोजनावर प्रश्नचिन्ह उभं केलं आहे.
हाणामारीचीही पार्श्वभूमी
या विचित्र घटनेआधी काही दिवसांपूर्वी पाटाकडील तालीम मंडळ आणि श्री शिवाजी
तरुण मंडळ यांच्यात झालेल्या सामन्यात वाद विकोपाला जाऊन थेट हाणामारीत रूपांतर झाला होता.
पोलिसांना हस्तक्षेप करत सौम्य लाठीचार्ज करावा लागला होता. त्यामुळे सध्या स्पर्धांमध्ये शिस्तीचा मुद्दा केंद्रस्थानी आला आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/rajkotamadhyaye/