कोकणात ठाकरेंना धक्क्यावर धक्के, विनायक राऊतांच्या कट्टर समर्थकाने साथ सोडली, राणेंच्या उपस्थितीत भाजप प्रवेश

कोकणात ठाकरेंना धक्क्यावर धक्के, विनायक राऊतांच्या कट्टर समर्थकाने साथ सोडली, राणेंच्या उपस्थितीत भाजप प्रवेश

ठाकरे गटाचे माजी खासदार विनायक राऊत,

माजी आमदार वैभव नाईक यांचे अत्यंत विश्वासू साथीदार आणि

कट्टर शिवसैनिक रामदास उर्फ रामू विखाळे यांनी

पत्नी स्वरुपा विखाळे यांच्यासह भाजपचा झेंडा हाती धरला

सिंधुदुर्ग : कट्टर शिवसैनिक रामू विखाळे यांच्यासह पत्नी – माजी जिल्हा परिषद सदस्या स्वरूपा विखाळे

यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची साथ सोडत भाजपमध्ये प्रवेश केला. विखाळे हे माजी खासदार विनायक राऊत,

माजी आमदार वैभव नाईक यांचे अत्यंत विश्वासू साथीदार मानले जात. यावेळी कलमठ ग्रामपंचायत सदस्य प्रियाली आचरेकर,

Related News

युवा उपतालुकाप्रमुख सचिन आचरेकर यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला.

ठाकरे गटाचे माजी खासदार विनायक राऊत, माजी आमदार वैभव नाईक यांचे अत्यंत

विश्वासू साथीदार आणि कट्टर शिवसैनिक रामदास उर्फ रामू विखाळे यांनी पत्नी स्वरुपा विखाळे यांच्यासह भाजपचा झेंडा हाती धरला.

कलमठ ग्राम पंचायत सदस्य प्रियाली आचरेकर, युवा उपतालुकाप्रमुख सचिन आचरेकर, बूथ प्रमुख विनय हडकर,

शाखाप्रमुख प्रणय आचरेकर यांच्यासह नंदकिशोर कोरगावकर, निनाद विखाळे आणि जवळपास २०० शिवसैनिकांनी रविवारी भाजपात जाहीर प्रवेश केला.

वैभववाडीतील ठाकरे गटाचे नेते आणि सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे माजी संचालक दिगंबर पाटील

यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला अखेरचा जय महाराष्ट्र केला.

मत्स्य उद्योग व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत असंख्य

कार्यकर्त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. कणकवली येथे ओम गणेश निवासस्थानी हा प्रवेश करण्यात आला.

भास्कर जाधवांच्या स्टेटसची चर्चा

दुसरीकडे, ठाकरे गटाचे नेते आणि आमदार भास्कर जाधव यांच्या स्टेटसची चर्चा सुरू आहे.

म्होरक्या जिद्दी आणि धाडसी असेल, तर माणसंच काय जनावरं पण विश्वास टाकतात.

यावर मंत्री नितेश राणेंनी उद्धव ठाकरेंवर सडकून टीका केली आहे. म्होरक्या उद्धव ठाकरे असून उद्धव ठाकरेंची लायकी त्यांच्या सहकाऱ्यांना आता

कळत असल्यामुळे त्या माणसाला स्वतःच्या भावाला, घर सांभाळता येत नाही, तो पक्ष काय सांभाळणार? असा सवाल नितेश राणेंनी विचारला.

उद्धव ठाकरे यांच्या अडीच वर्षाच्या कालावधीत महाराष्ट्राची जेवढी अधोगती झाली, तेवढी केव्हाही झाली नव्हती.

त्यामुळे त्यांच्या पक्षातील लोक मार्ग काढत वेगवेगळ्या पक्षात जात आहेत. स्वतःचं भविष्य घडवू शकले नाही,

ते दुसऱ्याचं भविष्य काय घडवणार, अशी टीका मंत्री नितेश राणेंनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे.

More update click here : https://ajinkyabharat.com/nagpurat-punha-ekda-saam-hardik-anani-suryakumar-khenar-saam-kavha/

Related News