अकोट–अकोला मेमूच्या वेळा पूर्ववत ठेवा,अन्यथा रेल्वे रोखू !

मनसेचा दक्षिण मध्य रेल्वेला थेट इशारा
प्रतीनिधी : देवेंद्र खिरकर

३५२ प्रवाशांच्या सह्या; मनसेचा दक्षिण मध्य रेल्वेला थेट इशारा

अकोट–अकोला मेमूच्या वेळेत अचानक बदल झाल्यामुळे प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त झाली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य सरचिटणीस ॲड. नंदकिशोर शेळके यांनी दक्षिण मध्य रेल्वेला स्पष्ट इशारा दिला आहे की, जर वेळ पूर्ववत ठेवली नाही तर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. अकोट–अकोला मेमू नोव्हेंबर २०२२ पासून धावत आहे आणि अकोट शहरासह परिसरातील हजारो प्रवाशांसाठी ‘जीवनवाहिनी’ ठरली आहे. शासकीय व निमशासकीय कर्मचारी, बँक कर्मचारी, खाजगी नोकरदार तसेच विद्यार्थी वर्ग या रेल्वेवर अवलंबून आहेत, मात्र नांदेड विभागाने कोणतीही पूर्वसूचना न देता वेळेत बदल केल्याने प्रवाशांचे दैनंदिन वेळापत्रक कोलमडले आहे.

सकाळी कार्यालये, महाविद्यालये आणि शाळांमध्ये पोहोचताना या बदलामुळे प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. अकोट व आजूबाजूच्या ग्रामीण भागातील प्रवासी संघटनांनी या बदलाला जोरदार विरोध नोंदवला आहे. याप्रसंगी ३५२ नियमित रेल्वे प्रवाशांच्या सह्या असलेले निवेदन १७ डिसेंबर २०२५ रोजी अकोला रेल्वे स्टेशनवर स्टेशन मास्तरमार्फत डी.आर.एम., नांदेड विभागास सादर करण्यात आले.

निवेदनात नमूद केले आहे की, मेमू रेल्वेची वेळ तात्काळ पूर्ववत केली नाही तर मनसे व प्रवासी वर्ग रेल्वे रोखण्यासह तीव्र आंदोलन करेल. प्रवाशांच्या अडचणी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे.

Related News

या घडामोडीमुळे अकोट–अकोला मेमू रेल्वेच्या भविष्या आणि प्रवाशांच्या सोयीसंदर्भातील निर्णयावर सर्वांचे लक्ष केंद्रीत झाले आहे. वेळेत बदल झाल्यामुळे प्रवाशांचे दैनंदिन जीवन खंडित होत असल्याने प्रशासनावर दबाव वाढला आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने ही समस्या लवकरच सोडवावी, अशी अपेक्षा आहे.

read also : https://ajinkyabharat.com/5-heartwarming-rinku-rajguru-emotional-moments-at-the-end-ich-tiemotional-scene-goes-viral-on-social-media/

Related News